पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला असल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज रेड अलर्ट कायम असून, अंजुणे धरणाने 90 मीटरची पाण्याची पातळी ओलांडल्याने चारही दरवाजे सकाळी उघडण्यात आले. केरी, सर्वण, कारापूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंजुणे धरणाने 190 मीटर पाण्याची पातळी ओलांडल्याने चारही दरवाजे उघडण्यात आले. या धरणाची पातळी 90.75 मीटर इतकी आहे तर एकूण पातळी 93.2 मीटर आहे. वाळवंटी नदीला येणाऱ्या भरती-ओहोटीचा तसेच पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्यात येत आहे. सध्या 5 सेंटिमीटर एवढे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
घाटांतून प्रवास करणे धोक्याचे ठरत असून, गोवा- बेळगाव मार्गे केरी-अंजुणे भागात रस्त्याची कडा कोसळली आहे.
कोकण रेल्वे मार्ग बेभरवशाचा बनला असून, अनेक गाड्या अन्यत्र वळविण्यात आल्या आहेत; तर चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अंकोला तालुक्यातील शिरूर भागात राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. तेथे मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सकल भागात पाणी वाढल्याने गोवा- मंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.