Sangolda Illegal Houses Demolished Dainik Gomantak
गोवा

Sangolda: सांगोल्डातील सर्व 22 बेकायदेशीर घरे जमीनदोस्त; बेघरांसाठी नाईक घेणार CM सावंतांची भेट

Sangolda Illegal Houses Demolished: दिवसभरात 15 अनधिकृत घरे जमीनदोस्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) उर्वरीत सात घरे देखील जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

Pramod Yadav

Sangolda Illegal Houses Demolished

सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेवर उभारण्यात आलेली सर्व 22 बेकायदेशीर घरे अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर कोमुनिदादच्या प्रशासकांनी शुक्रवारी (ता.12) कारवाईला सुरुवात केली.

शुक्रवारी दिवसभरात 15 अनधिकृत घरे जमीनदोस्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) उर्वरीत सात घरे देखील जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेत तब्बल 22 घरे उभारली होती. ती बेकायदेशीर असल्याचा ठपका कोमुनिदाद प्रशासनाने ठेवला होता.

2012 सालापासून कोमुनिदाद आणि या घरमालकांमध्ये कायदेशीर लढा सुरू होता. येथील सर्व्हे क्र. 81/1 मधील ही 22 बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

आदेशानुसार, कोमुनिदादच्या प्रशासकांनी शुक्रवारी कारवाईला सुरुवात केली. संबधित घर मालकांनी कारवाईला जोरदार विरोध केला. मात्र, विरोधाला न जुमानता प्रशासकांनी सर्वच्या सर्व 22 घरे अखेर जमीनदोस्त केली आहेत.

बेघरांच्या निवाऱ्यासाठी आमदार केदार नाईक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

कारवाईत 22 घरे हटविण्यात आली असून, यामुळे बेघर झालेल्यांची स्थानिक आमदार केदार नाईक यांनी भेट घेतली. बेघर झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत केदार नाईक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहेत.

आज (शनिवारी) सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत बेघर नागरिकांच्या निवाऱ्याबाबतच्या पर्यायावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

Pakistan Cricket: कोच पळाले, खेळाडू काढले अन् आता सिलेक्टर्सचा राजीनामा! मोहसीन नक्वींच्या नोटीसने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; लॉर्ड्स पराभवानंतर तिळपापड

Goa Assembly Session 2026: खेळाडूंची 98 लाखांची बक्षिसे महिनाभरात मिळणार; क्रीडामंत्री तवडकरांची विधानसभेत हमी, यापुढे वितरणाला विलंब होणार नाही

Goa ST Reservation: धनगर समाजाच्या 'एसटी' दर्जाच्या प्रस्तावावर पुन्हा प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर

SCROLL FOR NEXT