Aleixo Sequeira  Dainik Gomantak
गोवा

Goa Island Resort: सिंगापूरच्या सेंटोसा बेटासारखे गोव्यातही ‘रिसॉर्ट’ उभारणार; मंत्री ॲलेक्स सिक्वेरांचा मानस

Aleixo Sequeira: माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी गोव्यात जलमार्ग वापर अल्पप्रमाणात केला जातो, तो वाढविण्यासाठी सरकारकडून सागरी क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी गोव्यात जलमार्ग वापर अल्पप्रमाणात केला जातो, तो वाढविण्यासाठी सरकारकडून सागरी क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. बंदर कप्तान आणि पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांनी सिंगापूरमधील सेंटोसा बेटाच्या धर्तीवर गोव्यात बेट रिसॉर्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रकल्पाचा उद्देश पर्यटकांना आकर्षित करण्याचा आहे.

राज्यभर पसरलेल्या असंख्य छोट्या बेटांपैकी एकावर रिसॉर्ट स्थित असेल, बेट ओळखून प्रकल्पासाठी अहवाल आयआयटी मद्रास तयार करणार आहे. बेटावर प्रवासी टर्मिनल, सागरी क्षेत्रासाठी हरित हायड्रोजन पुरवणारी सुविधा, लोडिंग क्रेन, पाणबुडी प्रकल्प, इत्यादींसारख्या अनेक सुविधांचा समावेश असणार आहे, अशी माहिती सिक्वेरा यांनी दिली.

भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) - गोव्याच्या लॉजिस्टिक्स परिषदेत ते बोलत होते. जेथे राज्य सरकारने सीआयआय आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, साखळी यांच्याशी लॉजिस्टिक्समधील उत्कृष्ट केंद्र स्थापित करण्यासंदर्भात इरादा पत्रावर स्वाक्षरी केली. नद्यांच्या मुखावर वाळूच्या पट्ट्या तयार करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT