Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Khazan Farming: खाजन शेतीसाठी जागतिक बॅंक गोव्याला देणार 1600 कोटींचे कर्ज, मंत्री सिक्वेरांनी दिली माहिती

Aleixo Sequeira: खाजन कृषी संस्कृतीत गोव्याला वेगळी ओळख मिळवून देते. त्यामुळे तिचे संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Aleixo Sequeira World Bank Loan Khazan Farming

पणजी: गोव्याला समृद्ध वारसा देणारी, कृषी, मत्स्य आणि मीठ उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण असणारी खाजन शेती आज धोक्यात आहे, परंतु आमचे सरकार त्यांच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी साहाय्य करत आहे. खाजन कृषी संस्कृतीत गोव्याला वेगळी ओळख मिळवून देते. त्यामुळे तिचे संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

ते कला आणि संस्कृती भवनात आयोजित गोव्याची खाजन कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी खाजन सोसायटी ऑफ गोवाच्या अध्यक्ष एल्सा फर्नांडिस, संचालक सचिन देसाई, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, जलसंसाधन खात्याचे अंकुश गावकर आणि संजीव जोगळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री सिक्वेरा म्हणाले, खाजन शेतीच्या पुनरुज्जीवनासाठी जागतिक बॅंक गोव्याला १,६०० कोटी रुपये कर्ज देणार आहे. त्यामुळे योग्य ती पाऊले उचलत आपल्याला खाजन शेतीचा मिळालेला वारसा टिकविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

समृद्ध वारसा

खाजन शेती एकट्याने निर्मिली नाही. सर्वांनी एकत्रितपणे जोपसलेली ही परंपरा आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रितपणे त्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. खाजन शेतीचे ज्ञान पारंपरिक पद्धतीने आमच्यापर्यंत आले त्यामुळे खाजन संबंधी योग्य प्रकारचे दस्ताऐवजीकरणही होणे गरजेचे आहे. आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपल्या सर्वकाही पुरवतो असे प्रतिपादन फर्नांडिस यांनी केले.

१६०० कोटी कर्ज!

जागतिक बँकेने गोव्याला १६०० कोटी कर्ज देण्यास पुढाकार घेतला आहे. ही रक्कम मोठी आहे परंतु खाजन ही गोव्याची विशेष ओळख आहे. खाजनचा संरक्षणासाठी जे काही करणे शक्य आहे ते केले जाईल असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT