MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Carlos Ferreira: क्रॉस वोटिंगची खोटी बातमी प्रसारीत केल्याबद्दल रिपब्लिक टिव्हीने माफी मागावी - फरेरा

माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा फरेरा यांचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

हळदोणा: राष्ट्रपती पदासाठी (Presidential Election) सोमवारी (दि.18) झालेल्या मतदानात कॉग्रेस आमदार कार्लोस फरेरा (MLA Ad. Carlos Alvares Ferreira ) यांनी क्रॉस वोटिंग केले. अशा आशयाची बातमी अर्नब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्हीने (Republic TV) प्रसारित केली. ही बातमी खोटी असून रिपब्लिक टिव्हीने जाहीररित्या आपली माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आमदार कार्लोस फरेरा यांनी दिला आहे.

कार्लोस फरेरा यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. 'गोव्यात कॉग्रेसचे एकूण 11 आमदार आहेत. राष्ट्रपती पदाचे मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने त्यासाठी कोणताही व्हिप लागू होत नाही. मतदान केल्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी मला प्रतिक्रिया विचारली असता मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीला योग्य वाटते त्याप्रमाणे मतदान केले आहे. मी विकाऊ नाही. गोवा आणि लोकशाही संरक्षण करण्यासाठी मी इथे आहे. असे उत्तर मी प्रसारमाध्यमांना दिले.' असे फरेरा यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

मात्र, रिपब्लिक टिव्हीने मी क्रॉस वोटिंग (Cross Voting) केले, अशा आशयाची बातमी केली. व माझी प्रतिमा मलिन केली. रिपब्लिक टिव्हीने खोटी बातमी प्रसारित केल्या प्रकरणी माझी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा कार्लोस फरेरा यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी (presidential elections) सोमवारी देशात मतदान पार पडले. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Mumu) आणि युपीए कडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) उमेदवार आहेत. गुरूवारी (दि.21) या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT