Court Order Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

Aldona sexual assault case: २०१२ मधील प्रकरणात ७५ वर्षीय मार्टिन सोरेस याला दोषी ठरवलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम ठेवली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या २०१२ मधील प्रकरणात ७५ वर्षीय मार्टिन सोरेस याला दोषी ठरवलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम ठेवली.

केवळ वयाचे कारण सांगून गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नाही, असे स्पष्ट करत न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने २०१८ मध्ये बाल न्यायालयाने सुनावलेली १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. एप्रिल २०१२ मध्ये हळदोणेतील मार्टिन सोरेस याने शेजारी राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेला टॉवेल आणण्याच्या बहाण्याने घरात बोलावले.

नंतर त्याने तिला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना काही दिवसांनंतर पीडितेने घरी सांगितली. मे २०१२ मध्ये म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बाल न्यायालयाने सोरेस याला दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

स्थगितीची मागणीही फेटाळली

खंडपीठाने सोरेसचा जामीन रद्द करून त्याला तात्काळ पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी शिक्षेला ६ आठवड्यांची स्थगिती मिळावी, ही आरोपीच्या वकिलांची मागणीही न्यायालयाने फेटाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT