Aldona pet dog shooting Dainik Gomantak
गोवा

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Dog shot in Aldona Goa: हळदोणा येथे एका व्यक्तीने एका पाळीव कुत्र्याच्या तोंडावर गोळी (एअर गन) झाडली. यात कुत्र्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sameer Panditrao

म्हापसा: हळदोणा येथे एका व्यक्तीने एका पाळीव कुत्र्याच्या तोंडावर गोळी (एअर गन) झाडली. यात कुत्र्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

श्‍वानमालक विशाल घाडी यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळी त्यांच्या ‘कोको'' या पाळीव कुत्र्याच्या तोंडावर एकाने गोळी झाडली. सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि कुत्रा रक्तबंबाळ अन् जखमी अवस्थेत घरी परतला.

तेव्हा ही घटना उघडकीस आली. कुत्र्याला ताबडतोब खोर्जूवे येथील एंजल्स फॉर अ‍ॅनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की गोळीमुळे कुत्र्याच्या जबड्यातील हाडे तुटली आहेत, ती फ्रॅक्चर झाली आहेत आणि दातही तुटले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी, घाडी यांनी उत्तर गोव्यातील ‘सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अनिमल्स’कडे तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT