Goa alcohol Deaths Dainik Gomantak
गोवा

Liquor Deaths Goa: गोव्यात दारूमुळे होतो 'इतक्या' लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी उघड; सर्वाधिक मृत्‍यू 41 ते 50 वयोगटातील

Goa alcohol Deaths: आरोग्‍यमंत्री राणे यांनी सादर केलेल्‍या उत्तरातून गेल्‍या दोन वर्षांत गोमेकॉ, आयपीएचबी आणि आरोग्‍य खात्‍याच्‍या इस्‍पितळांमध्‍ये ३,४२६ मद्यपींना उपचारांसाठी दाखल करण्‍यात आले.

Sameer Panditrao

पणजी: दारूमुळे राज्‍यात दर महिन्‍याला सरासरी २७ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे आरोग्‍यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरातील आकडेवारीवरून समोर आले आहे. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याबाबतचा प्रश्‍न विचारला होता.

गोमेकॉ, मानसोपचार इस्‍पितळ (आयपीएचबी) आणि आरोग्‍य विभागांतर्गत येणाऱ्या इस्‍पितळांमध्‍ये किती मद्यपी रुग्‍णांना उपचारांसाठी दाखल केले आणि त्‍यातील कितीजणांचा मृत्‍यू झाला, असे प्रश्‍न आमदार शेट यांनी विचारले होते.

त्‍यावर आरोग्‍यमंत्री राणे यांनी सादर केलेल्‍या उत्तरातून गेल्‍या दोन वर्षांत गोमेकॉ, आयपीएचबी आणि आरोग्‍य खात्‍याच्‍या इस्‍पितळांमध्‍ये ३,४२६ मद्यपींना उपचारांसाठी दाखल करण्‍यात आले, त्‍यातील ६५१ जणांचा मृत्‍यू झाला. मृतांत ६२९ पुरुष आणि २२ महिलांचा समावेश असल्‍याचे दिसून येते. दोन वर्षांत ६५१ जणांचा दारूमुळे मृत्‍यू झाल्‍याचे समोर आल्‍याने राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला सरासरी २७ मद्यपींचा मृत्‍यू होत असल्‍याचे दिसून येते.

१९ ते ६० वयोगटातील २,४५० जणांवर उपचार

1.गेल्‍या दोन वर्षांत गोमेकॉ, आयपीएचबी आणि आरोग्‍य खात्‍याअंतर्गत येणाऱ्या इस्‍पितळांमध्‍ये ज्‍या ३,४२६ जणांवर उपचार झाले, त्‍यातील २,४५० जण १९ ते ६० या वयोगटातील असल्‍याचे मंत्री राणे यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसते.

२.गोमेकॉत उपचार घेतलेल्‍या रुग्‍णांमध्‍ये ४१ ते ५० वयोगटातील सर्वाधिक ५०५ रुग्‍ण होते. त्‍यानंतर ५१ ते ६० वयोगटातील ४९२, ३१ ते ४० वयोगटातील ३५१ आणि २१ ते ३० वयोगटातील ८७ मद्यपींवर उपचार केल्‍याचेही मंत्री राणे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT