श्री रामनाथ देवस्थान Dainik Gomantak
गोवा

‘देवा श्री रामनाथा’ भक्तिगीतांच्या अल्बमचे लोकार्पण मंगळवारी होणार

तीन मराठी, पाच कोकणी गीतांचा समावेश

दैनिक गोमन्तक

सासष्टी: श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा यांच्यातर्फे निर्मित ‘देवा श्री रामनाथा’ या भक्तिगीतांच्या अल्बमचे लोकार्पण मंगळवार 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज यांच्या मंगल हस्ते लोकार्पण होणार आहे. हा सोहळा श्री रामनाथ देवस्थानात आयोजित करण्यात आला आहे. या अल्बममधील 8 भक्तिगीते भारतातील आठ नामांकित गायक व गायिकांनी गायिली आहेत. त्यात 3 मराठी व 5 कोकणी गीतांचा समावेश आहे. ही सर्व गीते श्री रामनाथ पंचिष्ठ देवतांच्या स्तुतीवर आधारीत आहेत.

मुंबईतील संगीत विश्र्वातील प्रख्यात संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर यांनी संगीत संयोजन केले आहे. या सर्व गाण्यांचे ध्वनिमुद्रण आजिंबवासन स्टुडिओ (मुंबई) येथील अवधुत वाडकर व नितीन कयारकर, हार्मनी स्टुडिओ मुंबई येथील विवेक कांबळी, ग्रॅविटी स्टुडिओ मुंबई येथील हेमंत पारकर व पुणे येथील डॉन स्टुडिओत करण्यात आले आहे

या अल्बममधील गाणी जागतिक कीर्तीचे गायक महेश काळे, शंकर महादेवन, स्वप्निल बांदोडकर, सुदेश भोसले, राहुल देशपांडे, पद्मश्री सुरेश वाडकर, आर्या आंबेकर व बेला शेंडे यानी आपल्या गोड व भावमधुर आवाजात गायिली आहेत.

या आल्बमचे उद्दीष्ट संगीतातून श्री रामनाथ पंचिष्ठ देवतांची महंती सर्वत्र व्हावी हे आहे. तसेच नव्या पिढीला या देवाचा इतिहास या माध्यमातुन समजावा. हा आल्बम देवस्थान कचेरीत उपलब्ध केला जाईल असे श्री रामनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रवास नायक यानी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या समवेत चिटणीस बाजीराव तळावलीकर, खजिनदार मयुर केणी, मुखत्यार राजेंद्र कोसंबे, गीतकार नंदन हेगडे देसाई, संगीतकार यतिन तळावलीकर हे मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

खरी कुजबुज: लवकरच गोव्यात 'रिअल काँग्रेस पार्टी?'

Khelo India Tribal Games: गोवा एकूण चार पदकांसह अठराव्या क्रमांकावर; 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व दोन ब्राँझपदके

FC Goa vs Bengaluru: एफसी गोवा संघाला आवश्यकता एकाग्रतेची, बंगळूर एफसीविरुद्ध शनिवारी फातोर्ड्यात लढत

SCROLL FOR NEXT