Akshat Naik Death Case Dainik Gomantak
गोवा

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Akshat Naik Death Case Update: अक्षत नाईक या युवकाच्या मृत्यूप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. अक्षतच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी मृत अक्षत याच्या वडिलांसह कुटुंबीयांनी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: अक्षत नाईक या युवकाच्या मृत्यूप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. अक्षतच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी मृत अक्षत याच्या वडिलांसह कुटुंबीयांनी केली आहे. तशी लेखी तक्रार मृत अक्षत याचे वडील राजेश नाईक यांनी सोमवारी (ता.२९) सायंकाळी डिचोली पोलिसांत केली आहे.

ज्यांनी अक्षत याला काम करण्यासाठी नेले होते, त्यांच्यासह घरमालकाने निष्काळजीपणा केल्यानेच माझ्या मुलाचा जीव गेला. तसेच मृत्यूप्रकरणी घटना स्थळावरील पुरावे नष्ट करून संशयास्पद गोष्टी जाणूनबुजून लपविल्या आहेत, असा दावा वडील राजेश नाईक यांनी केला आहे.

दरम्यान, म्हावळींगे येथील ज्या घरात अक्षत याला विजेचा ‘शॉक’ लागून मृत्यू आला, त्या घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सोमवारी (ता.२९) पंचनामा केला. यावेळी वीज खात्याचे अभियंतेही उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NEET Protest In Goa: 'नीट'आंदोलनाआडून राष्ट्रविरोधी अजेंडा? पणजी अन् म्हापशातील आंदोलनावर भाजपचा थेट हल्लाबोल

Mrunal Thakur Dating Yashasvi Jaiswal: 33 वर्षीय अभिनेत्री, 24 वर्षीय क्रिकेटर! मृणाल ठाकुर आणि यशस्वी जयस्वाल रिलेशनशिपमध्ये? 'तो' Video Viral

खरी कुजबूज: 'आरजीपी'चा ताबा नेमका कुणाकडे?

VIDEO: "मला अल्लाहानचं पाठवलं!", गर्भवती महिलेसह 3 जणींवर माथेफिरुकडून जीवघेणा हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

India Squad For Sri Lanka Test Series: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जडेजाचं पुनरागमन, वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीतून बाहेर

SCROLL FOR NEXT