Goa Anjuna Dam Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: अंजुणे धरणाजवळ भीषण अपघात! युवतीचा मृत्यू, 5 प्रवासी जखमी

Goa Anjuna Dam Accident: अक्कलकोट येथून गोव्यातील पर्वरीकडे प्रवास करत असताना मारुती कार (जीए-०३-झेड-०७९२) अंजुणे धरणाजवळ आली असता चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: केरी-सत्तरी येथे अंजुणे धरणाजवळ मंगळवारी (ता. २७) पहाटेच्‍या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात स्नेहल घातेगस्ती (२७) या युवतीचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत.

अक्कलकोट येथून गोव्यातील पर्वरीकडे प्रवास करत असताना मारुती कार (जीए-०३-झेड-०७९२) अंजुणे धरणाजवळ आली असता चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. ही कार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या मातीच्या उतारावर आदळून अपघातग्रस्त झाली.

या अपघातात कारमधील स्नेहल हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्‍पितळात दाखल करण्यात आले आहे.

नंदकुमार ऊर्फ गोपाळ नाईक (६०, रा. साल्वादोर-द-मुन्‍द, पर्वरी) हे कार चालवत होते. ते अक्कलकोटहून चोर्लाघाटमार्गे गोव्याकडे येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT