Akbar Mulla was questioned in the GCA administration scam
Akbar Mulla was questioned in the GCA administration scam  
गोवा

अकबर मुल्लाची ‘ईओसी’कडून चौकशी

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) कारभारमधील कोट्यवधी घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) चार वर्षापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणातील संशयित अकबर मुल्ला याची सुमारे दोन तास सखोल चौकशी केली. या चौकशीवेळी त्याला पैशांच्या व्यवहारप्रकरणी अनेक प्रश्‍न विचारण्यात आले मात्र काही प्रश्‍नांना ते उत्तरे देऊ शकले नाहीत. पुढील आठवड्यात संशयित विनोद ऊर्फ बाळू फडके याची चौकशी होणार आहे. 


गेल्या आठवड्यात असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई याची चौकशी झाली होती. त्याच्या चौकशीनंतर या आठवड्यात विनोद फडके व अकबर मुल्ला या दोघांना आर्थिक गुन्हे कक्षाने समन्स बजावले होते. फडके हे गोव्याबाहेर असल्याने त्याने तसे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी कळविले होते. अकबर मुल्ला याला आज चौकशीस हजर राहण्यास सांगण्यात आले होते त्यानुसार ते उपस्थित राहिले. 


या घोटाळ्याची चौकशी अजून प्राथमिक टप्प्यातच असल्याने संशयितांना पुन्हा चौकशी बोलवण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


२०१६ साली या कक्षाने असोसिएशनमधील ३.३१ कोटी घोटाळाप्रकरणी गुन्हा नोंद केला होता तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, माजी सचिव विनोद फडके व खजिनदार अकबर मुल्ला याना संशयित केले होते. तपासावेळी जीसीए कार्यालयावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले होते तसेच ज्या खात्यामध्ये असोसिएशनचा व्यवहार झाला होता ती खाती गोठवण्यात आली होती. चौकशीसाठी चेतन देसाई, विनोद फडके तसेच अकबर मुल्ला या तिघांनाही अटक झाली होती. बीसीसीआयकडून गोवा क्रिकेट असोसिएशनला क्रिकेटसाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप या तिघा संशयिताविरुद्ध ठेवण्यात आला होता. याप्रकरणी प्राथमिक चौकशीत पोलिसांना घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT