Mopa International Airport Photos | Mopa Airport | Goa International Airport | Manohar International Airport  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport : गोवेकरांना नोकरीची संधी; दोन बड्या एअरलाईन्ससाठी पदभरती सुरु

5 जानेवारीपासून सुरु होणार विमानसेवा. या पार्श्वभूमीवर अकसा अन् विस्तारा या एअरलाईन्सने पदभरती सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी ( मोपा ) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या विमानतळावरील विमानसेवा 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अकसा अन् विस्तारा या एअरलाईन्सने पदभरती सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.

(Akasa Air and Vistara airlines look to hire ground staff for Mopa operations)

जीएमआरने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, विमानतळासाठीच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे सुरु आहे. लवकरच ही प्रक्रिया पुर्ण होईल. सध्या अकसा आणि विस्तारा या एअरलाइनची पदभरती सुरु आहे. याबाबत बोलताना अकसाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विनय दुबे आणि मुख्य विपणन अधिकारी, बेल्सन कौटिन्हो, यांनी स्पष्ट केले आहे की, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे नियुक्तीचे कामकाज पुर्ण केले जाणार आहे.

अकसा एअरलाइने अद्याप गोव्याच्या दोन विमानतळांपैकी कोणत्या एका विमानतळावरुन उड्डाणे होणार आहेत हे अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु आक्सा एअरला गोव्याला बेंगळुरू आणि इतर शहरांशी जोडण्यासाठी अधिक प्रयत्नशिल असल्याची माहिती समोर आली आहे.

दाबोळी येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे अकसा एअरलाइनने ऑपरेशनसाठी कोणतीही परवानगी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांना विमान सेवा देण्यासाठी थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे. मात्र इंडिगो आणि गो फर्स्ट या एअरलाईन्सनी घोषणा केली आहे की. ते गोव्याच्या दुसऱ्या विमानतळावरून दररोज थेट उड्डाणे चालवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT