Bicholim: बुद्धीची देवता, अर्थातच मंगलमूर्ती गणेश म्हणजे भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे दैवत. अशा या विघ्नहर्त्या गणरायाची केवळ बाह्यपूजा नव्हे, तर आंतरिक पूजन करण्याला महत्त्व आहे, असे उदगार डिचोलीचे सुपुत्र तथा नामवंत शास्त्रीय गायक पंडित अजित कडकडे यांनी व्यक्त केले.
चतुर्थीनिमित्त पंडित अजित कडकडे (Ajit Kadkade) हे आपल्या डिचोलीतील घरी आले आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांची भेट घेतली असता, त्यांनी आराध्य दैवत गणपतीची महती कथन केली. पृथ्वी प्रदक्षिणा म्हणून गणपतीने आपल्या मातेला प्रदक्षिणा घालून मातेवरील श्रद्धा दाखवून दिली. त्यामुळे आपल्या मातेवर श्रद्धा ठेवून तिचा सन्मान राखला तर आपण गणपती बाप्पाचे खरे उपासक होऊ. जग बदलत चालले आहे.
चतुर्थीत रोषणाई आणि सजावटीचे प्रमाण वाढले आहे. पण चतुर्थी साजरी करताना परंपरा आणि उत्साहही तेवढाच कायम आहे. असेही कडकडे म्हणाले. डिचोली शहरातील नागरिकांनीही कडकडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच घरातील गणेशाचे दर्शन घेतले.
पहिली दोन वर्षे आणि ''कोविड'' मार्गदर्शक तत्त्वांमुळे दोन वर्षे मिळून गेली चार वर्षे मला चतुर्थीसाठी घरी येणे शक्य झाले नाही, अशी खंत पं. कडकडे यांनी व्यक्त केली. पं. कडकडे यांच्या घरातील दीड दिवसाच्या गणपतीचे गुरुवारी रात्री उत्साहात विसर्जन करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.