Vasco Hit and run case accused Dainik Gomantak
गोवा

Goa Hit and Run Case : तुटलेल्या नंबरप्लेटच्या साहाय्याने संशयिताच्या आवळल्या मुसक्या

विमानतळ कर्मचारी ठार

दैनिक गोमन्तक

Dabolim Hit and Run Case : दाबोळी महामार्गावर ‘हिट ॲण्ड रन’ प्रकारात शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाने धडक दिल्याने निखिल शाजू हा विमानतळ कर्मचारी ठार झाला. या घटनेनंतर धडक दिलेल्या वाहनचालकाने पलायन केले होते.

मात्र, पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या तुटलेल्या नंबरप्लेटच्या साहाय्याने वाहन शोधून काढून चालक संदीप मालवणकर याला अटक केली.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''हिट ॲण्ड रन''ची घटना शुक्रवारी रात्री घडली. दाबोळी विमानतळावरील कर्मचारी निखिल शाजू (वय २३, मूळ रा. केरळ) येथील रस्त्यातून जाताना त्याला कारची धडक बसली.

काही तासांतच संशयित जेरबंद

पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करत असताना एका कारची पुढील नंबरप्लेट अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांनी त्या नंबरप्लेटच्या आधारे तपास सुरू केला आणि कारचालकाला अटक केली.

संदीप मालवणकर (वय 38, रा. बायणा) असे अटक केलेल्या संशयित वाहनचालकाचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT