Crime  Dainik Gomantak
गोवा

मोपा पोलिसांची मोठी करवाई , विमानतळावर ७० हजारांचा गांजा जप्त

संशयितास पकडले , ७०० ग्रॅम गांजा जप्त

दैनिक गोमन्तक

पेडणे : मोपा विमानतळ पोलिसांनी पोलिस स्थानक सुरू झाल्यानंतर आज प्रथमच विमानतळाच्या प्रवेशद्वारावर गांजा विकणाऱ्या राजन कुमार वसंत शहा (वय २१) या युवकाला अटक केली आहे. मोपा विमानतळ पोलिस निरीक्षक महेश केरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक हळर्णकर, जयंत गाड, अनिकेत गाड, आशिष परब, गुंडू गावस आदींनी ही कारवाई केली. पोलिसांनी राजन कुमार वसंत शहा यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ७०० ग्रॅम गांजा सापडला. त्या गांजाची बाजारात ७० हजार रुपये एवढी किंमत आहे. संशयितावर अमलीपदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

मोपा विमानतळ प्रकल्पात गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वतंत्र पोलिस स्थानक स्थापन झाले व तेथे पोलिस निरीक्षकपदी महेश केरकर यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर मोपा विमानतळ परिसरात प्रथमच अमलीपदार्थ विरोधी कारवाई झाली. अमलीपदार्थाचा छडा लावताना पोलिस निरीक्षक महेश केरकर यांनी शिताफीने सापळा रचून संशयितास पकडले व त्याच्याकडून ७०० ग्रॅम गांजा जप्त केला. चौकशीनंतर संशयिताला ताब्यात घेऊन त्याला रितसर अटक केली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, पेडणे ( Pernem) तालुका पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोपा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT