Airpod Lost In Kerala 
गोवा

जग खूप मोठं आहे आणि तरीही छोटं! केरळमध्ये हरवलेले एअरपॉड दोन आठवड्यांनी गोव्यात सापडले

Pramod Yadav

Airpod Lost In Kerala Found In Goa: केरळमध्ये प्रवासात निखिल या व्यक्तीचे महागडे एअरपॉड अचानक गायब झाले. प्रवासात शेजारी बसलेल्या व्यक्तीने एअरपॉड चोरी केल्याचे उघड झाले पण, एअरपॉडचे लोकेशन ट्रॅक केल्यावर ते गोव्यात असल्याचे समजले.

निखिलने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विटकरुन एअरपॉड आणि लोकेशन शेअर करत माहिती दिली. दरम्यान, दोन आठवड्यांनी एअरपॉड मूळ मालकाला परत मिळाले आहेत.

निखिल यांचे एअरपॉड गोव्यात असल्याचे ट्विट वाऱ्यासारखे व्हायरल झाले होते. अनेकांनी गोव्यात आल्यानंतर एअरपॉड घेतो असे आश्वासन दिले होते. दरम्यान, मडगाव येथे पोलीस ठाण्यातून एअरपॉड घेतल्यानंतरचे फोटो निखिल यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत.

"तुमचा विश्वास बसेल का? संकेत, गोवा पोलीस, केरळ पोलीस, ट्विटर, आणि माझ्या ट्विटला उत्तर देणाऱ्या सर्वांचे आभार! किती सुंदर कथा आहे. जग खूप मोठं आहे आणि तरीही छोटं!", असे कॅप्शन निखिलने एअरपॉड मिळाल्यानंतरच्या त्याच्या पोस्टसाठी लिहले आहे.

निखिल केरळमध्ये फिरायला गेले असता त्यांचे एअरपॉड हरवले होते. त्यानंतर त्यांनी एक्सवर याबाबत ट्विट केले होते.

"केरळमध्ये प्रवास करत असताना माझे नवे हेडफोन हरवले, यावेळी माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या गोव्यातील एका व्यक्तीने हेडफोनची चोरी केली. मागील दोन दिवसांपासून हा व्यक्ती दक्षिण गोव्यात राहत आहे. तो कदाचित गोव्यातच राहतो. आल्वारो द लोयोला फुर्ताडो रस्ता, सासष्टी दक्षिण गोवा," असा पत्ता निखिल यांनी ट्विट केलं होते.

अनेकांनी निखिल यांचे ट्विट रिट्विट केले आहे. तसेच हेडफोन मिळाल्यास परत आणून देतो, अशी ग्वाही देखील दिली होती. अखेर दोन आठवड्यांनी मुंबईच्या निखिल यांना एअरपॉड सुरक्षितपणे परत मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT