स्मार्ट सर्च! इंटरनेटच्या मदतीने शोधले हरवलेल्या हेडफोनचे लोकेशन; गोव्यातील व्यक्तीने केरळमध्ये केली चोरी

अलिकडे झालेल्या डिजिटल क्रांतीच्या मदतीने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सहज शोध घेणे शक्य झाले आहे.
Man Tracks His Lost AirPods To South Goa
Man Tracks His Lost AirPods To South Goa
Published on
Updated on

प्रवासात किंवा बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्या जवळच्या वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता असते. किंमती वस्तू चोरी झाल्यानंतर त्या परत मिळवण्यासाठी पोलीस तक्रार हा एकच पर्याय असतो. त्यातून ती वस्तू पुन्हा मिळेल याची शक्यता फार कमी असते.

पण, अलिकडे झालेल्या डिजिटल क्रांतीच्या मदतीने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सहज शोध घेणे शक्य झाले आहे. याचे उत्तम उदाहरण अलिकडेच समोर आले. केरळमध्ये चोरी झालेले हेडफोनच्या लोकेशनचा एकाने इंटरनेटच्या मदतीने शोध घेतला आहे.

सोशल मिडिया एक्सवर निखिल (@niquotein) नावाच्या एका युझरने याबाबत ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

"केरळमध्ये प्रवास करत असताना माझे नवे हेडफोन हरवले, यावेळी माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या गोव्यातील एका व्यक्तीने हेडफोनची चोरी केली. मागील दोन दिवसांपासून हा व्यक्ती दक्षिण गोव्यात राहत आहे. तो कदाचित गोव्यातच राहतो. आल्वारो द लोयोला फुर्ताडो रस्ता, सासष्टी दक्षिण गोवा," असा पत्ता निखिल यांनी ट्विट केला आहे.

Man Tracks His Lost AirPods To South Goa
Vagator Beach: दारू बेतली जीवावर? वागातोर समुद्रात दिल्लीच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू
Man Tracks His Lost AirPods To South Goa
Man Tracks His Lost AirPods To South Goa

ट्विटरमुळे जर माझे हरवलेले हेडफोन सापडण्यास मदत झाली, तर मुलांना सांगण्यासाठी काय स्टोरी असेल ना? असे निखिल यांनी ट्विट केले आहे. तसेच, ज्यांनी माझे हेडफोन चोरी केले त्यांची बदनामी करण्याचा माझा उद्देश नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

अनेकांनी निखिल यांचे ट्विट रिट्विट केले आहे. तसेच हेडफोन मिळाल्यास परत आणून देतो, अशी ग्वाही देखील दिली.

कसे सापडले हेडफोनचे लोकेशन?

निखिल यांनी हेडफोनवर लॉस्ट मोड अॅक्टीवेट केला आहे. हेडफोन चोरी केलेल्या व्यक्तीने अनेकवेळा सुरु आणि बंद केला. लॉस्ट मोड अॅक्टीवेट असल्याने दुसऱ्या फोनवर कनेक्ट करताना त्यावर त्यांचा नंबर दिसतो, अशी माहिती निखिल यांनी दिली. इंटरनेटच्या मदतीने हेडफोनचे लोकेशन ट्रॅक करण्यास मदत झाली.

दरम्यान, अद्याप हरवलेले हेडफोन निखिल यांना परत मिळालेले नाहीत. हेडफोन मिळाल्यानंतर त्याची अपडेट देतो असेही निखिलने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com