Flight Cancellation Dainik Gomantak
गोवा

Flight Cancellation: विमान रद्द करून प्रवाशाला गोव्यात अडकवले; ग्राहक आयोगाचा विमान कंपनीला दणका, हॉटेल खर्चासह 64 हजार भरपाईचे आदेश

Goa Flight Cancellation Passenger Compensation: ऐन पर्यटन हंगामात गोव्याहून परतीचे विमान अचानक रद्द झाल्याने प्रवासी कुटुंबासह गोव्यात अडकला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ऐन पर्यटन हंगामात गोव्याहून परतीचे विमान अचानक रद्द झाल्याने प्रवासी कुटुंबासह गोव्यात अडकला. रात्रीच्या मुक्कामासाठी त्याला तातडीने हॉटेलची व्यवस्था करावी लागली. या प्रकरणात पंजाबमधील ग्राहक आयोगाने विमान कंपनीला दणका देत हॉटेलचा १४ हजार रुपयांचा खर्च परत करण्यासह मानसिक त्रास आणि गैरसोयीपोटी ३० हजार रुपये, तसेच न्यायालयीन खर्चापोटी २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कंपनीला एकूण ६४ हजार रुपये भरपाई द्यावी लागणार आहे.

पंजाबमधील ग्राहक आयोगाचे अध्यक्ष जगदीश्वर कुमार चोप्रा आणि सदस्य मंदीप कौर यांनी हा आदेश दिला. प्रवाशाने स्वतःसह अन्य तीन जणांसाठी अमृतसर-गोवा आणि परतीच्या प्रवासाची ८२ हजार ५८८ रुपयांची विमान तिकिटे आरक्षित केली होती. गोव्याहून परतण्याचे विमान अचानक रद्द झाल्याची माहिती त्याला ई-मेलद्वारे देण्यात आली. पर्यायी विमानाने त्याचा परतीचा प्रवास दुसऱ्या दिवशी करण्यात आला.

विमान रद्द झाल्याने गोव्यात अडकलेल्या कुटुंबाला ऐनवेळी हॉटेलची व्यवस्था करावी लागली. त्यासाठी १४ हजार रुपये खर्च झाल्याचे प्रवाशाने सांगितले. हा खर्च आणि मानसिक त्रासाबद्दल भरपाईची मागणी विमान कंपनीने फेटाळल्याने त्याने ग्राहक आयोगात धाव घेतली.

कंपनीचा दावा

विमानतळावरील दाट धुके आणि अत्यल्प दृश्यमानतेमुळे एटीसीकडून आवश्यक परवानगी वेळेत मिळाली नाही. त्यामुळे विमान रद्द करावे लागले, असा दावा कंपनीने केला. प्रतिकूल हवामान ही ‘फोर्स मॅज्योर’मधील बाब असल्याने तसेच प्रवाशाने पर्यायी विमानाने प्रवास करण्यास संमती दिल्याने अतिरिक्त भरपाईची गरज नसल्याचे कंपनीने सांगितले.

आयोग म्हणाला...

प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च असल्याने प्रतिकूल हवामानात विमान उडवता येणार नाही, हे आयोगाने मान्य केले. मात्र, विमान रद्द केल्यानंतर प्रवाशांना आवश्यक मदत करण्याची जबाबदारी कंपनीचीच राहते. प्रवाशांसाठी निवासाची व्यवस्था किंवा अन्य ठोस मदत उपलब्ध करून न दिल्यास त्याने स्वतः केलेला आवश्यक आणि कागदोपत्री सिद्ध होणारा खर्च कंपनीने भरावा, असे आयोगाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

Gas Leak Fire Incident: गॅस गळतीने घरात आगीचा भडका; गोव्यात मायलेकी होरपळल्या, गोमेकॉत उपचार सुरू

Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

IND vs WI: अभिषेक शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! SKYचा मोठा रेकॉर्ड निशाण्यावर; दुसऱ्या टी-20 सामन्यात गोल्डन चान्स

SCROLL FOR NEXT