Flight Dainik Gomantak
गोवा

Goa To Indore Flight: खुशखबर! गोवा ते इंदूर विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू; दिल्लीतून आणखीन 3 विमाने येणार

Goa To Delhi Flight: दाबोळीवरून इंदूरसाठीचे विमान सकाळी १०.५५ ला निघून दुपारी १२.३५ ला पोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दुपारी १.१५ ला इंदूरहून विमान निघून ते दाबोळीवर दुपारी २.५५ वाजता पोचणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एअर इंडियाने दाबोळी ते इंदूर अशी नवी विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय दिल्लीतून दाबोळी विमानतळावर येण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून दररोज आणखीन तीन विमानांची घोषणा केली आहे.

दाबोळीवरून इंदूरसाठीचे विमान सकाळी १०.५५ ला निघून दुपारी १२.३५ ला पोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दुपारी १.१५ ला इंदूरहून विमान निघून ते दाबोळीवर दुपारी २.५५ वाजता पोचणार आहे.

सध्या एअर इंडिया एक्सप्रेसकडून गोव्यातून आठवड्याला ४० उड्डाणे सुरू असून ती बंगळूर एअर इंडियाने दिल्ली ते गोवा (दाबोळी विमानतळ) या मार्गावर दररोज तीन नियमित उड्डाणांची घोषणा केली आहे. ही उड्डाणे पहाटे ५.१५, दुपारी १२.०० आणि रात्री ९.४५ वाजता दिल्लीहून सुटतील.

या नव्या वेळापत्रकामुळे दिल्ली आणि गोवा या दोन लोकप्रिय गंतव्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सोय होईल. दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या देशांतर्गत शहरांना तसेच दुबई या आंतरराष्ट्रीय ठिकाणी जोडतात. याशिवाय कंपनीकडून २७ देशांतर्गत आणि ५ आंतरराष्ट्रीय स्थळांशी एक-थांबा जोडणी देखील उपलब्ध आहे.

दिल्लीतून आणखीन ३ विमाने

एअर इंडियाने दिल्ली ते गोवा (दाबोळी विमानतळ) या मार्गावर दररोज तीन नियमित उड्डाणांची घोषणा केली आहे. ही उड्डाणे पहाटे ५.१५, दुपारी १२.०० आणि रात्री ९.४५ वाजता दिल्लीहून सुटतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT