Electricity MET
गोवा

'८५० मेगावॅट' ही विजेची सर्वोच्च मागणी नोंद! जादा दराने खरेदीचा भुर्दंड, सौरऊर्जेचा वापर वाढवण्याची गरज

Electricity Department: वातानुकूलन यंत्रांचा वापर राज्यात आता वाढला आहे त्यामुळे पूर्वी सायंकाळी वाढणारी विजेची मागणी आता उत्तररात्री २ वाजेपर्यंत वाढलेली असते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वातानुकूलन यंत्रांचा वापर राज्यात आता वाढला आहे. यामुळे पूर्वी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंतच वाढणारी विजेची मागणी आता उत्तररात्री २ वाजेपर्यंत वाढलेली असते. नेहमीच्या विजेपेक्षा २५ ते ३० टक्के जादा वीज या वेळेत लागते आणि ती खुल्या बाजारातून ७ ते १० रुपये प्रतियुनिट दराने खरेदी करावी लागते. एरव्ही वीज खरेदीचा दर हा ३ ते ४ रुपये युनिट असतो, अशी माहिती वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

फर्नांडिस म्हणाले, राज्यात आजवर ८५० मेगावॅट ही विजेची सर्वोच्च मागणी नोंद झाली आहे. दिवसभरात ५०० ते ६०० मेगावॅट विजेला राज्यभरात मागणी असते. सायंकाळी ६ नंतर त्यात वाढ होऊ लागते. कोविड काळात उद्योग बंद होते तरी विजेची मागणी कमी झालेली नव्हती. आता तर उत्तररात्रीपर्यंत विजेला मागणी असते. याचा अभ्यास केल्यावर वातानुकूलन यंत्रांचा वापर सार्वत्रिक झाल्याने असे होत असल्याचे दिसून आले आहे.

दरवर्षी विजेची मागणी सर्वसाधारणपणे १० टक्‍क्यांनी वाढते. सर्वसाधारण मागणीपेक्षा हे प्रमाण खचितच जास्त आहे. पूर्वी लोक झोपण्यास लवकर जात असावेत. आता ग्रामीण वा निमशहरी भागातही लोक उशिराने झोपतात, त्यामुळे ते रात्री २ वाजेपर्यंत वातानुकूलन यंत्रे चालू ठेवतात, असे दिसून आले आहे.

सौरऊर्जेचा वापर करा

यंदा सलगपणे ४५ दिवस पाऊस पडत आहे. हवामानात होणाऱ्या बदलामुळे हे होत आहे. गोमंतकीयांपुढे काय वाढून ठेवले आहे याची ही नांदी आहे, असे नमूद करून फर्नांडिस यांनी सांगितले, की पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारताना हरित ऊर्जा निर्मितीवर प्रत्येकाने भर द्यायला हवा. सरकारने आता मोफत सौर पॅनेल बसवण्याची योजना आणली आहे. त्यातून वीज बिल न येण्याची व्यवस्था केली आहे. त्याला जनतेने प्रतिसाद दिला पाहिजे.

दहा टक्‍के अधिक वापर

१) विजेची मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताण तर येतोच. वीज वाहून नेणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येत आहेत. तेवढे पुरेसे नाही, प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर सौरउर्जा निर्मिती मनावर घेतली तर वीज वितरण व्यवस्थेवर सध्या येणारा ताण कमी करता येतो.

२) राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाशी राज्य वीज खात्याचा वीज खरेदी करार आहे. मागणी वाढली की खुल्या बाजारातून वीज विकत घ्यावी लागते. सायंकाळी पथदीप पेटतात, घरात दिवे लावले जातात यामुळेही मागणी वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT