AI Wildlife Protection Dainik Gomantak
गोवा

AI Wildlife Protection: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी 'एआय'चा पहिला प्रयोग यशस्वी! जंगलातील प्रत्येक आवाजावर नजर; तस्करी आणि घुसखोरीला बसणार आळा

AI Wildlife protection System India: वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी येथील वनविभागाने प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) यशस्वी वापर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

हल्दवानी (उत्तराखंड): वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी येथील वनविभागाने प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) यशस्वी वापर केला आहे. यासाठी ‘एआय’ आधारित ‘फॉरेस्ट ॲकोस्टिक सर्व्हिलान्स सिस्टिम’ विकसित करण्यात आली आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ही यंत्रणा जंगलातील बेकायदा घुसखोरीच्या नोंदी ठेवणार असल्याने वन्यजीवांच्या तस्करीला यामुळे आळा बसेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दिली.

स्थानिक वातावरण लक्षात घेऊनच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये ‘एआय कॉम्प्युटिंग’, ‘ॲकोस्टिक सेन्सर’ आणि ‘लाँग रेंज वायरलेस कम्युनिकेशन’साठीच्या यंत्रांचा समावेश आहे. ही प्रणाली सातत्याने जंगलातून येणाऱ्या विविध आवाजांवर लक्ष तर ठेवेलच पण त्याचबरोबर काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने ती संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून देईल.

चोवीस तास सक्रिय

या संपूर्ण प्रणालीसाठी सौर ऊर्जेवर आधारित रिचार्जेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चोवीस तास ती सक्रिय राहील. आता ‘विद्युत ग्रीड’ची गरज संपुष्टात आली असल्याचे विभागीय वनअधिकारी कुंदनकुमार यांनी सांगितले. पारंपरिक देखरेख प्रणालीमध्ये मानवी गस्तीला महत्त्वाचे स्थान असते. वेळोवेळी निरीक्षणेही नोंदविता येतात. या ‘ फॉरेस्ट ॲकोस्टिक सर्व्हिलान्स सिस्टिम’चा वापर हा डिजिटल कानासारखा केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आवाजाचे विश्लेषण

जंगलामध्ये सातत्याने जे ध्वनी निर्माण होतात त्यांचे विश्लेषण करण्याचे काम हे ‘एआय’वर आधारित ॲकोस्टिक सेन्सरच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे कोणताही धोका या यंत्रणेपासून लपून राहू शकत नाही. या प्रणालीसाठी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून जंगल आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये यामुळे क्रांती येईल, असा विश्वास काही अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT