CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa: गोमंतकीयांसाठी आता AI Chatboat सुविधा! CM सावंतांची घोषणा; ऑनलाईन सर्व्हिस पोर्टल वापरणे होणार सोपे

Goa Online Services Portal: राज्यातील विद्यार्थ्यांना रोबोटीक्सचे शिक्षण देत आहोत राज्यातील ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेतला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील नागरिकांना गोवा ऑनलाईन सर्व्हिस पोर्टलच्या माध्यमातून विविध खात्यांच्या ज्या २७० सुविधा पुरविल्या जातात, त्या नागरिकांना अधिक सुलभरीत्या मिळाव्यात, कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी लवकरच पोर्टलवर एआय चॅट बोट सुविधा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज जाहीर केले.

ते आयटी खात्याद्वारे आयोजित गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५ मार्केट एक्सेस एक्‍पोच्या उद्‍घाटन समयी बोलत होते.

यावेळी आयटी मंत्री रोहन खंवटे, संचालक कबीर शिरगावकर, एमडी प्रवीण वळवईकर, सीईओ डी. एस प्रशांत उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा हे आता केवळ पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात नाही, तर इन्होवेशनसाठी देखील ओळखला जातो, आम्ही केवळ राज्यासाठी नव्हे तर देशाच्‍या विकासात शाश्‍वत आणि डिजिटल प्रगतीत महत्त्वाचे योगदान देत आहोत.

गोव्यात आम्ही ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नरत आहोत, ज्याच्या माध्यमातून आयटी कंपन्या, स्टार्टअप आणि नव उद्योगांना मदत आणि डिजिटल अर्थकारण वाढविण्यासाठी मदत होणार आहेत. गोव्यातही अनेकजण नवीन स्टार्टअपसाठी पुढाकार घेत आहेत याचे आनंद असल्याचे सावंत यांनी सांगितले.

स्टार्टअपसना ३.९२ कोटी रुपयांचे अनुदान

राज्य सरकारने१४७ स्टार्टअपसना ३.९२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यासोबतच स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. सरकारी सेवा अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी डेटा केंद्र देखील उभारण्यात येत आहेत. आम्ही राज्यातील विद्यार्थ्यांना रोबोटीक्सचे शिक्षण देत आहोत राज्यातील ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेतला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

डिजिटल परिवर्तन, प्रक्रियेला चालना

ग्लोबल कॅपबिलीटी सेंटर ही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जागतिक प्रतिभा, तंत्रज्ञान आणि कमी खर्चासाठी स्थापन केलेली ऑफशोअर केंद्रे आहेत. ते आयटी, वित्त किंवा ग्राहक सेवा यासारख्या विशिष्ट व्यवसाय कार्यांवर लक्ष केंद्रित करतात आणि बहुतेकदा नवीन उपक्रम, स्टार्टअपस, डिजिटल परिवर्तन आणि प्रक्रियेला चालना देतात. हेद्राबाद, पुणे, बंगळूर या ठिकाणी अशा प्रकारची सेंटर कार्यरत आहेत.

१५० ठिकाणी वायफाय सुविधा

गोवा हे आता केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नव्हे तर स्टार्टअपसाठी देखील ओळखले जाते. गोव्यातील इंटरनेट सुविधा सुधारत आहेत. मोफत सार्वजनिक वायफाय शहर, ग्रामीण भागात १५० ठिकाणावर पुरविण्यात आलेत. एसएसटी समाजातील मुलांनाच नव्हे तर ईडब्लुएस विद्यार्थ्यांना देखील लॅपटॉप आणि आयटी प्रशिक्षण देण्याचा आमचा विचार आहे. लवकरच महिला सशक्तीकरण योजना देखील राबविण्यात येणार असल्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT