Sasashti  Dainik Gomantk
गोवा

Sasashti News : अहिल्यादेवी होळकर मातृत्व, नेतृत्व, दातृत्वाच्या प्रतीक : सुनीलाताई सोवनी

Sasashti News : मडगावात अहिल्याबाई होळकर यांची जयंती

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News :

सासष्टी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्वाच्या प्रतीक असल्याचे उद्गार प्रसिद्ध पत्रकार, लेखिका, संशोधक व वक्त्या पुणे येथील सुनीलाताई सोवनी यांनी आज मडगावात काढले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. हा कार्यक्रम रवींद्र भवनच्या सभागृहात झाला.

अहिल्याबाई होळकर या निर्मळ, शुद्ध, चारित्रसंपन्न, कर्तृत्वशालिनी होत्या म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक असे संबोधतात. शिवाय तिला लोकमाता असेही संबोधले जाते. त्यांनी राज्यकारभार सांभाळून आपले कर्तृत्व सिद्ध केले. तिने आपल्या जिवनात कार्य करताना सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामयः याचे तंतोतंत पालन केले, असे त्या म्हणाल्या.

हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात समन्वय गीत व दीप प्रज्वलनाने व सांघिक गीताने झाली. समितीच्या अध्यक्षा वर्षा झोरे यांनी स्वागत केले. कार्यवाह मेधा परुळेकर यानी प्रस्तावना केली. अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाची माहिती घेऊन तिच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे परुळेकर यांनी सांगितले. या प्रसंगी पत्रभेट या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीमा नाईक यांनी केले. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर, अभय प्रभू हे मान्यवर उपस्थित होते.

अहिल्याबाईंच्या जीवनात वैभवासह वैराग्यही!

आपण जे काम करतो, जे निर्णय घेते ते शंकराचे वरदान आहे, असे अहिल्याबाई सांगत. त्यांनी राज्यात महिला सबलीकरणावर जास्त भर दिला. गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी त्यांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती केली, अर्थव्यवस्थेला गती दिली.

मंदिरांची पुर्ननिर्मिती केली. त्यांनी पर्यावरणाचे रक्षणही केले. त्यांचे जिवन म्हणजे वैभवाबरोबर वैराग्यही होते, असेही सोवनी यांनी सांगितले.आपल्या मुलालाही त्यांनी शिक्षा देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या न्यायप्रियतेची सद्या जास्त गरज असल्याचे सोवनी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT