aguda fort Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort : आग्वाद किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना शुल्कवाढ ;गोेमंतकीयांना द्यावे लागणार 100 रुपये

परंतु, सरकारचा हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत अनेकांनी यावर टीका केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Aguada Fort : म्हापसा सिकेरी येथील आग्वाद किल्ला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आवर्जून या वास्तूला भेट देतात. या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी आता आकारल्या जाणाऱ्या शुल्कात राज्य सरकारकडून वाढ केली आहे.

तसेच, स्थानिक गोमंतकीयांना देखील यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. परंतु, सरकारचा हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत अनेकांनी यावर टीका केली आहे.

या नवीन दरानुसार परदेशी पर्यटकांना ४०० रुपये, भारतीय पर्यटक २०० रुपये, तर ज्येष्ठ नागरिक व लहान मुले (८-१५वयोगट) यांना १०० रुपये तसेच गोमंतकीय नागरिक प्रौढ व्यक्ती १०० रुपये व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी ५० रुपये असा दर आकारला जाणार आहे.

गोवा मुक्ती लढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांनी आग्वाद किल्ल्यात कारावासाची शिक्षा भोगली आहे. अशा ऐतिहासिक किल्ल्याचे राज्य खात्याकडून मॉडर्न संग्रहालयात याचे रुपांतर केले आहे. त्याचप्रमाणे, पार्किंगसाठी वेगळे शुल्क मोजावे लागते.

ज्यात पहिल्या चार तासांसाठी चारचाकीला १०० रुपये व दुचाकीला ५० रुपये, तर त्यानंतरच्या प्रति तासाला चारचाकीला अतिरिक्त १०० तर दुचाकीस ५० रुपये शुल्क आहे.

पर्यटक, स्थानिकांत शुल्काबाबत नाराजी

दरम्यान, यासंदर्भात पर्यटकांनी अंसतोष व्यक्त करीत हे दर परवडणारे नसून, सरकारने या दरांवर पुनर्विचार करावा,असे मतप्रदर्शन केले आहे.

जास्तीत जास्त ५० ते ७० रुपये प्रवेश शुल्क ठेवले पाहिजे, असे पर्यटकांना म्हणणे आहे. त्याचबरोबर गोमंतकीयांना सुद्धा प्रवेश शुल्क मोजावे लागणार असल्याने स्थानिकांनी हे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

गोमंतकीयांना आपलाच इतिहास पाहण्यासाठी पैसे द्यावे लागणे हे चुकीचे असल्यानी अनेकांनी यावर परखड मत व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT