Agriculture News : मोरजी, एक काळ असा होता सरकारी नोकरी श्रेष्ठ अणि शेती व्यवसाय कनिष्ठ समजला जायचा. पण आज स्थिती वेगळी आहे. शेती करून चांगले व घसघशीत उत्पन्न घेऊन स्वावलंबी जीवन जगता येते हे अनेकांनी सिद्ध करून दाखविले आहे.
पेडणे तालुक्यातील चिवई-तुये येथील रवी नाईक व श्रेया नाईक या दाम्पत्याने तर त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
शेती व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी आपल्या शेतीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून भातशेती बरोबरच भाजीपाला, फळे, फुले फुलविण्याचे काम नाईक दाम्पत्याने केले आहे. श्रेया नाईक यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची भाजी, फळांची लागवड केली आहे.
विदेशी पर्यटकांना आवडणारी जाणारी भाजी व ‘सालात’साठी वापरण्यात येणाऱ्या फळांनाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. कलिंगड, वाली, मिरच्या, तांबडी भाजी, मुळे, कारली, भुईमूग, हळसांदे आदी भाजीपाला त्यांच्या शेतीत, बागायतीत दिसून येतो.
झेंडू फुलांची बागसुद्धा नाईक दाम्पत्याने फुलविली आहे. त्यांच्या मळ्यात स्वच्छता, टापटीपपणा, चालण्यासाठी व्यवस्थित व सुटसुटीत वाटा आहेत. तेथे गेल्यावर एक माणसाला एक वेगळीच अनुभूती येते.
सरकारकडून वेळीच नुकसान भरपाई मिळावी : रवी नाईक
डोंगर माळरानावरील शेतीला गवे, रानडुक्कर, माकड आणि इतर रानटी प्राण्यांपासून सदाच धोका असतो. त्यांच्याकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. ही रानटी जनावरांची पावले आता लोकवस्तीकडेही वळू लागली आहेत. माणसांचा हल्ले करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती उभारली जात आहे.
त्यासाठी जंगलांची कत्तल केली जातेय. पाणी, भक्ष्य शोधत शोधत ही रानटी जनावरे लोकवस्ती गाठू लागली आहेत. या प्राण्यांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वेळीच नुकसान भरपाई दिली तर ते मोठ्या जोमाने पुन्हा शेतीकडे वळतील. त्यामुळे राज्यात हरितक्रांती होण्यास मदत होईल, असा विश्वास रवी नाईक यांनी व्यक्त केला.
प्रत्येक सरकारी कर्मचारी दिवसाला आठ तास काम करतो. शेतीसाठी तुम्ही चार तास दिले तरी त्यापेक्षा तिप्पट-चौपट पैसे मिळू शकतात. मात्र त्यासाठी शेती करण्याची आवड हवी. एकदा आवड निर्माण झाली की मग आपण कधीही शेताकडे पाठ फिरवणार नाही. दुसरी गोष्ट शेती हा सुरक्षित व्यवसाय आहे.
- श्रेया नाईक, चिवई-तुये
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.