Agonda  Dainik Gomantak
गोवा

Agonda News : श्रमधाम योजना; दुसऱ्या टप्प्यात शाळा बांधणार : सभापती रमेश तवडकर

Agonda News : मार्ली-तिरवाळमध्ये रविवारी शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News :

आगोंद, श्री बलराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रमधाम योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला आता लवकरच रविवार १० मार्चपासून सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळी १० वा. मार्ली, तिरवाळ या ठिकाणी श्रमधाम योजनेच्या माध्यमातूनच सरकारी शाळेचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू करणार आहेत.

तळपण येथील काही कार्यकर्त्यांसह श्रीमती रूपा मैत्री यांच्या घराला आमदार व सभापती तवडकर यांनी भेट दिली. अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या या घरात श्रीमती रूपा मैत्री यांचे कुटुंब वास्तव्य करीत आहे. या घराची परिस्थिती पाहून सभापतींनी तात्काळ श्रमधाम योजनेखाली घर बांधून देण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी या योजनेतून गेल्या वर्षी २० घरे बांधण्यात आली. अत्यंत गरीब, दु:खी अशा लोकांना सभापतींच्या मदतीने घरे बांधून देण्यात आली आहेत. सभापतीत तवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेचे देशभर कौतुक होत आहे.

गरिबांना सरकारी योजनेतून घरे काही तांत्रिक कारणामुळे बांधता येत नसल्यास सभापती लोकसहभागाच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देत आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पुण्यधाम योजना

बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या श्रमधाम संकल्पने बरोबरच या काणकोण मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबासाठी पुण्यधाम ही योजना राबवण्यात येणार आहे.

दुर्बल अशा कुटुंबाला दरमहा ३००० रुपयांचे मानधन देण्याची नवी संकल्पना लवकर लागू करण्यात येणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी श्रीस्थळ येथे बोलताना जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT