Agonda Green Swachh Panchayat Award Lok Sabha Speaker Om Birla Chief Minister Dr. Honored by Sawant  Gomantak Digital Team
गोवा

Agonda : ‘आगोंद’ला हरित, स्वच्छ पंचायत पुरस्कार; मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांच्या हस्ते सन्मान

राज्यातून एकमेव पंचायत : लोकसभा सभापती ओम बिर्ला, मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांच्या हस्ते सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda : संपूर्ण गोवा राज्यातून एकमेव आगोंद पंचायतीला हरित आणि स्वच्छ पंचायत हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सरपंच प्रीतल फर्नांडिस व माजी सरपंच फातिमा रॉड्रिग्स या दोघांना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गुरुवार, 15 रोजी शेळेर उच्च माध्यमिक विद्यालयात‌ आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.

देशभरातील पंचायतींमधून गोव्यातील एकमेव आगोंद पंचायतीची या पुरस्काराकरता निवड झाली. महिनाभरापूर्वीच सरपंचपदी निवड झालेल्या प्रीतल‌ फर्नांडिस यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीला जाऊन हा पुरस्कार स्वीकारला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुंदर आणि शांत समुद्रकिनारा म्हणून यापूर्वी गौरविण्यात आलेल्या या आगोंद पंचायतीने यावेळी घरोघरी गोळा केलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली होती. ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांना या खताचे मोफत वितरण करून कचऱ्यासंबंधी जागृती केली होती. ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केले. याची दखल केंद्र सरकारतर्फे घेण्यात आली.

मागच्या वर्षभरात पंचायतीने ओला आणि सुका कचरा व्यवस्थित नियोजन करून गोळा केला. त्यापासून खत तयार करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. आता या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. नुकताच जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या केंद्रीय समितीतर्फे नेवरा येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी हे खत बऱ्यापैकी उपस्थित नागरिकांनी खरेदी केली. त्यामुळे पंचायतीला महसूल मिळाला. या सर्वाची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.

- प्रीतल फर्नांडिस, सरपंच, आगोंद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT