Agonda News : कार्यकर्त्यांत स्नेह वाढवणे हाच उद्देश : रमेश तवडकर

सभापती तवडकर : आमोणे येथे ‘टिफिन पे चर्चा’ कार्यक्रम रंगला
'Tiffin Pe Charcha' Programme
'Tiffin Pe Charcha' ProgrammeGomantak Digital Team
Published on
Updated on

Agonda News : भाजप केंद्रीय समितीतर्फे लक्ष्यप्राप्तीकरता अनेक कार्यक्रम देण्यात येत असतात. ‘टिफिन पे चर्चा’ हासुद्धा असाच एक कार्यक्रम आहे. पंतप्रधानांनी अनेक धाडसी निर्णय घेऊन देशप्रेमी नागरिकांची मने जिंकलेली आहेत. ‘टीफिन पे चर्चा’ कार्यक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये संवाद घडवून आणणे, प्रेम व स्नेह वाढवणे असा उद्देश आहे.

कार्यकर्त्यांमुळेच मी श्रम-धाम संकल्पनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे शिवधनुष्य पेलू शकलो, असे सभापती रमेश तवडकर म्हणाले. भाजप केंद्रीय समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिनाभर कार्यक्रम दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘टिफीन पे चर्चा’ हा कार्यक्रम बुधवार, 8 रोजी आमोणे-काणकोण येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

'Tiffin Pe Charcha' Programme
Agonda Beach: जैवविविधता समिती सदस्यांची आगोंद समुद्र किनाऱ्याला भेट

या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, उपाध्यक्ष शाबा नाईक गावकर, सरचिटणीस दिवाकर पागी, सचिव संजू तिळवे, कोषाध्यक्ष मनोज नाईक, प्रदेश महिला उपाध्यक्ष चंदा देसाई, महिला मोर्चाच्या अध्यक्ष वृंदा सतरकर, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, सारा देसाई, सायमन रिबेलो, अमिता पागी, द.गो. उपाध्यक्ष महेश नाईक, खोतिगावचे सरपंच आनंदु देसाई, श्रीस्थळचे सरपंच सेजल गावकर, जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय तुबकी, सदस्य शिरीष पै, नारायण देसाई, अजित पैंगीणकर, काशिनाथ फळदेसाई, गणेश गावकर व अन्य प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Tiffin Pe Charcha' Programme
Agonda Village panchayat : आगोंदच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्स पायउतार; कारण गुलदस्त्यातच !

लोकसभा सभापती ओम बिर्ला येणार

गुरुवार, 15 रोजी लोकसभा सभापती ओम बिर्ला आपल्या प्रेमापोटी काणकोणात येत आहेत. आगोंद येथील विनंती वेळीप व अर्धफोंड येथील हरीश्चंद्र नाईक या गरजूंच्या घराचे निरीक्षण ते करतील तसेच याच दिवशी 2 घरांचा गृहप्रवेश होईल. आपल्या कार्यकर्त्यांनी तमाम नागरिकांचा विश्वास संपादन करायचा आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागावे, असे तवडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com