Agonda Shacks Incident  Dainik Gomantak
गोवा

Agonda Canacona: शॅक्समालकाची जामिनावर सुटका

Agonda Shacks Accident: मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद, धवलखाजन येथील शॅक्सला आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सात कामगार व शॅक्समालक शिवलिंग चलवादी यांच्यावर गुरुवार, २७ रोजी गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरा वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका केली, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळालेली आहे.

दरम्यान, या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मूळ राजस्थान येथील व सध्या फोंडा येथे वास्तव्यास असलेला नवीन (४०) याचे वडील आणि भाऊ गुरुवारी सायंकाळी काणकोणात पोहोचले. शुक्रवार, २८ रोजी त्यांच्या उपस्थितीत मडगाव इस्पितळात राखून ठेवण्यात आलेला मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आगोंद-धवलखाजन येथील २ शॅक्स व ७ कुटीरे मंगळवारी उत्तररात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. यावेळी पेशाने सुतार असलेल्या नवीन याला आपला जीव गमवावा लागला होता.

शिवलिंग चलवादी यांचा सोल्मेट शॅक्स व मनोज पागी यांच्या ‘ओमकार’ शॅक्सचे मिळून सुमारे १ कोटी २० लाखांचे नुकसान झाले असण्याचा प्राथमिक अंदाज मालक चलवादी यांनी व्यक्त केला आहे. पोलीस चौकशीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आगीत जळालेले साहित्य

‘सोल्मेट’ शॅक्सच्या एका मोठ्या खोलीत २७ नवीन एसी, २७ गिझर, २७ टी.व्ही., ८ फ्रीज, स्वयंपाकाकरता लागणारी विविध यंत्रे, विविध प्रकारचे किचन साहित्य, लाकडी फर्निचर, ४ पाण्याकरता लागणाऱ्या मोटर्स, ३ रिकामे व १ भरलेला सिलिंडर, १ पेट्रोलवर चालणारी मोटर, २ मच्छीमारांच्या नावेच्या मोटर्स शिवाय ‘ओमकार’ शॅक्सचे व कुटिरांतील‌ साहित्य या आगीत‌ भस्मसात झाले.

पोलिसांना दिली माहिती

मंगळवारी उत्तररात्री आग दुर्घटनेची माहिती देऊन घटनास्थळी जमाव कामगारांना मारबडव करत असून तुम्ही येथे येऊ नका. शक्य असल्यास पोलिस व अन्य संबंधित यंत्रणेला कळवा, असे कामगारांनी आपल्याला फोनवर सांगितल्याचे मालक चलवादी यांनी सांगितले. आपण पोलिस स्थानक गाठून माहिती दिली व अग्निशमन दलाला संपर्क केला, असे‌ ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी आणलेले साहित्य

अन्यत्र असलेले किमती साहित्य या दुर्घटनेच्या दोन दिवस आधी ‘सोल्मेट’ शॅक्सवर स्थलांतरित केले होते. या ठिकाणी पुढील पर्यटन हंगामाकरता फर्निचरचे काम हरीष, नवीन, प्राइसिंग व धनसिंग असे ४ व वेल्डिंगचे अन्य ४ कामगार गेले महिनाभर करत होते. मुसळधार पाऊस व खंडित वीजपुरवठा यामुळे त्यांनी काम सायंकाळी उशिरा बंद‌ केले होते, असे हरिष या कामगाराने आपणास सांगितल्याची माहिती शॅक्समालक चलवादी यांनी दिली.

कामगारांना पोलिस संरक्षण

आगोंद-धवलखाजन येथील आग दुर्घटना मंगळवारी उत्तररात्री घडली, त्यावेळी बंद खोलीत झोपलेल्या नवीन याला उठविण्याचा अन्य ७ जणांनी प्रयत्न केला. मात्र, आग फैलावल्यामुळे तो आत अडकून पडला. त्यावेळी तिथे मोठा जमाव जमला असल्याने कामगार तिथून‌ पळाले होते. काणकोण पोलिसांनी त्यांना शोधून संरक्षण दिले. जमावाच्या हाती ते लागले असते तर चित्र वेगळे दिसले असते, असे एका स्थानिकाने यासंबंधी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT