Agonda Beach Dainik Gomantak
गोवा

Agonda: आगोंद किनाऱ्यावरील 18 आस्थापनांचे टाळे काढले! न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही, सर्व खात्यांचे वैध परवाने सादर

Agonda Beach: न्यायालयाच्या आदेशानुसार काणकोण उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर व आगोंद पंचायतीचे सचिव अमोल नाईक गावकर यांनी १८ आस्थापनांचे टाळे काढले.

Sameer Panditrao

काणकोण: आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील ६७ पैकी १८ आस्थापनांचे टाळे काढण्यात आले. आगोंद‌ किनाऱ्यावरील सागरी कासव संवर्धन भागातील ६७ पर्यटक रेस्टॉरंट व कुटिरांना चोवीस तासांत टाळे ठोकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काणकोण उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस यंत्रणेने आदेशाचे पालन करीत कारवाई केली होती, तर काही आस्थापन मालकांनी स्वतःहून आस्थापने बंद केली.

मात्र, यापैकी १८ आस्थापन मालकांनी आपल्याकडील सर्व खात्यांचे वैध परवाने असल्याची कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे सादर करून टाळे काढण्याची विनंती अर्ज केला होती. न्यायालयाच्या आदेशानुसार काणकोण उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर व आगोंद पंचायतीचे सचिव अमोल नाईक गावकर यांनी १८ आस्थापनांचे टाळे काढले.

ही आस्थापने खासगी मालकीच्या जमिनीत असली तरी त्यांचा विस्तार भरती रेषेच्या आत आहे. भरतीच्या वेळी भरतीचे पाणी पर्यटन आस्थापनात घुसण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

सागरी विभाग जबाबदार

आगोंद किनारा व तेथील समुद्री जीवसृष्टीची देखभाल व संवर्धन करण्याची जबाबदारी दक्षिण गोवा सागरी विभागाची आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्राखाली हा किनारा येत असल्याचे दक्षिण गोवा मरिन झोनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT