Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Business: शॅक व्‍यवसायासाठी वयोमर्यादेची अट जाचक

गोवा सरकारने जे नवीन शॅक धोरण जाहीर केले आहे

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारने जे नवीन शॅक धोरण जाहीर केले आहे त्‍यात हा व्‍यवसाय करण्‍यासाठी व्‍यावसायिकाची कमाल वयोमर्यादा 60 वर्षे ठेवल्‍याने संपूर्ण गोव्‍यातील शॅक व्‍यावसायिक नाराज असून पारंपरिक शॅक व्‍यावसायिकांना या व्‍यवसायातून बाहेर फेकायचे, हे या सरकारचे कारस्‍थान, अशा शद्बांत त्‍यांनी आपली नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

याचा जाब विचारण्‍यासाठी सोमवारी (ता.११) आम्‍ही पर्यटन संचालकांची भेट घेऊ, अशी माहिती गोवा शॅकमालक कल्‍याण संघटनेचे अध्‍यक्ष क्रुझ कार्दोज यांनी दिली.

क्रुझ कार्दोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शनिवारी (ता.९) दक्षिण गोव्‍यातील काही शॅक व्‍यावसायिकांनी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांची भेट घेतली. यावेळी व्‍हिएगस यांनीही या धोरणावर आपला विरोध व्‍यक्‍त करताना, सरकारने हे धोरण ठरविण्‍यापूर्वी किनारपट्टी भागातील आमदारांना विश्र्वासात घेण्‍याची गरज होती, असे मत व्‍यक्‍त केले.

स्‍थानिक व्‍यावसायिकांसाठी ज्‍या अटी जाचक आहेत त्‍या बदलण्‍यात याव्‍यात यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन आपण चर्चा करू, असे यावेळी व्‍हिएगस यांनी सांगितले. शॅक हा पारंपरिक व्‍यवसाय आहे.

या व्‍यवसायात मागची कित्‍येक वर्षे काही व्‍यावसायिक असून त्‍यांनी वयाची 60 वर्षे कधीचीच पूर्ण केली आहेत. त्‍यामुळे ही अट त्‍यांना मारक ठरणार आहे. या पारंपरिक शॅक व्‍यावसायिकांना दूर करून सरकार दुसऱ्या कुठल्‍या तरी नव्‍या व्‍यावसायिकांना या व्यवसायात आणू पाहते, अशी आम्‍हाला शंका वाटते.

- क्रुझ कार्दोज, अध्‍यक्ष, गोवा शॅकमालक कल्‍याण संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT