Trinamool Congress Dainik gomantak
गोवा

एलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्कोंच्या राजीनाम्यानंतर, 'या' नेत्याचाही तृणमुलला रामराम

सत्तेमध्ये परतण्यासाठी भाजप गोव्यात आपली पूर्ण ताकद लावत आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: ताळगावातील बाबुश मोन्सेरात यांचे खंदे समर्थक व माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज (Tony Rodriguez) यांनी काँग्रेसमध्ये माजी नगरसेवक तसेच ताळगाव पंच सदस्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत ताळगावातून अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मोन्सेरात यांना शह देण्यासाठी ताळगाववासिय टोनी रॉड्रिग्ज यांना पाठिंबा देण्यास एकवटल्याचे दिसत होते. सतत चारवेळा ताळगाव मतदारसंघावर पकड असलेल्या बाबुश मोन्सेरात यांना त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जात असल्याने चिंता करण्याची वेळ आली आहे. दरम्यान एलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी तृणमूला (TMC) राजीनामा दिल्यानंतर, बेणावलीमधील पक्षाचे दुसरे नेते टोनी डायस यांनी राजीनामा दिला आहे. हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यात गोवा राज्याचाही समावेश आहे. सत्तेमध्ये परतण्यासाठी भाजप (BJP) गोव्यात आपली पूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसह तृणमुल कॉंग्रेस पक्षाने स्थानिक पक्षांबरोबर युती करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर (goa forward party) युती करत आपली ताकद वाढविण्यासाठी तयारी सुरु केली. मात्र कॉंग्रेसमधील विद्यमान आमदार तृणमुल (Trinamool) कॉंग्रेससह भाजपमध्ये सामील होऊ लागले आहेत. यातच कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी तृणमुल पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT