akasa airlines | Mopa International Airport | Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : इंडिगो, गो फर्स्ट नंतर आता 'या' एअरलाईन्सचं मोपा विमानतळावर लॅन्डींग

यापूर्वी विमानतिकीट बूक केलेल्या प्रवाशांना मात्र याचा मनस्ताप होण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Akasa Air : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. या विमानतळावरील विमानसेवा 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगो व गो फर्स्ट या दोन विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर अशा महत्वाच्या ठिकाणांवरुन येणारी आपली विमाने दाबोळीवरुन मोपावर विमान सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. तसेच विमान कंपन्यांनी विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पदभरती सुरु केली आहे.

दरम्यान, इंडिगो व गो फर्स्ट या दोन विमान कंपन्यांनंतर आता अकासा एअरलाईन्सनेही मोपाचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे या एअरलाईन्सची विमानं आता दाबोळीऐवजी मोपावरुन उड्डाण करणार आहेत. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा ते मुंबई आणि बंगळुरुसाठी 11 जानेवारीपासून विमानसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे यापूर्वी विमानतिकीट बूक केलेल्या प्रवाशांना मात्र याचा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

अकासा एअरलाईन्स मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) ते मुंबई आणि बंगळूर या ठिकाणी विमानसेवा चालू करणार आहे. मोपावरुन आपली विमानसेवा वळवणारी अकासा ही तिसरी डोमेस्टिक एअरलाईन्स ठरली आहे. याआधीच गो फर्स्ट आणि इंडिगो एअरलाईन्सने आपली विमानसेवा दाबोळीवरुन मोपावर हलवली आहे. अकासा विमान कंपनीने विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पदभरती सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

SCROLL FOR NEXT