Manikrao Thakare Dainik Gomantak
गोवा

'भाजपची खरी बी-टीम कोण आहे कळाले'! माणिकराव ठाकरेंची आपवर परखड टीका; X वरून केले 'एकला चलो' भूमिकेवर भाष्य

Manikrao Thakare: ठाकरे यांनी मंगळवारी ‘एक्स''या समाजमाध्यमाच्या व्यासपीठावरून पोस्ट करीत ‘आप’च्या एकला चलोच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आम आदमी पक्षाने जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत राज्यात सर्वत्र उमेदवार उभे केल्यामुळे बहुपक्षीय लढती झाल्या आणि त्याचा फायदा अनेक जागांवर भाजपविरोधी मतांचे विभाजन होण्यात झाला, ज्यामुळे भाजपच्या मोठ्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे गोमंतकीय जनतेने ‘आप''च्या फुटीर राजकारणाला शहाणपणाने नाकारले आहे. यावरून भाजपची खरी ‘बी-टीम’ कोण आहे, हे स्पष्ट होते, अशी परखड टीका गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

ठाकरे यांनी मंगळवारी ‘एक्स''या समाजमाध्यमाच्या व्यासपीठावरून पोस्ट करीत ‘आप’च्या एकला चलोच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. काँग्रेसबरोबर युती न करण्याचे सांगत एकला चलोची भूमिका घेणाऱ्या आणि सतत काँग्रेसवर टीका करण्याचे काम ‘आप’च्या नेत्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने केले.

जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी ४०च्यावर जागांवर उमेदवार दिले, पण एकच ठिकाणी त्यांना विजय मिळविला. तर उलट दुसऱ्या बाजूला ज्या काँग्रेसला ते हिणवत राहिले, पण काँग्रेसने २०२० च्या तुलनेत ४ ऐवजी यावेळी १० जागांवर विजय मिळविला. अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना दोन किंवा तीन क्रमांकाची मते मिळाली आहेत.

‘आप’ची भूमिका उघड झाली!

ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत ‘आप’ची भूमिका उघड झाली. गोव्याच्या जनतेने ''आप''च्या फुटीर राजकारणाला शहाणपणाने नाकारले आहे आणि खऱ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला बळकट केले आहे. प्रचारादरम्यान, ‘आप''चे नेते अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनी काँग्रेसला जोरदार लक्ष्य केले, वारंवार ‘भाजपची बी-टीम' म्हटले आणि सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याचा आरोप केला. परंतु निकालांनी एक वेगळीच कहाणी सांगितली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT