श्री देवी केळबाई देवस्थान Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : पंधरा दिवसांनी उघडला केळबाई मंदिराचा दरवाजा

प्रशासन ‘बॅकफूट’वर : शेकडो भाविकांनी घेतले दर्शन; मामलेदारांच्या उपस्थितीत कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : तब्ब्ल 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मये येथील श्री केळबाई देवीचे मंदिर अखेर खुले करण्यात आले. देवालय प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांच्या आदेशानुसार त्यांच्याच उपस्थितीत मंगळवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात मंदिराचे मुख्य द्वार उघडण्यात आले.

देवस्थानच्या पुजाऱ्याने कुलूप काढले. मुख्य द्वार उघडले असले, तरी गर्भकुड मात्र आज उघडलेली नाही. दार उघडल्यानंतर देवीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या तमाम भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा भक्तांच्या संघटितपणाचा विजय आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दुसऱ्या बाजूने पुजारी वगळता भाविकांना पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्य करण्यास निर्बंध घातले आहेत.

अन् प्रशासनाला आली जाग

मंदिर बंदप्रश्नी गोमंतक मंदिर महासंघ, परशुराम गोमंतक सेना, बजरंग दल आणि भारतमाता की जय या संघटनांनी रविवारी सभा घेतली होती. 48 तासांत मंदिराचे दार उघडले नाही, तर भाविकांच्या साक्षीने ''कुलूप'' काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

तसेच सोमवारी मामलेदारांना निवेदनही दिले होते. या घडामोडींनंतर सोमवारी सायंकाळीच मामलेदार परब यांनी देवस्थान समितीला ''कारणे दाखवा'' नोटीस जारी करून मंदिर खुले करण्याचे निर्देश दिले होते.

देवीच्या नावाचा जयघोष : मंदिर उघडताच, शेकडो भाविकांनी जयघोष करत देवीचे दर्शन घेतले. यावेळी नाईक गावकर समाजातील लोकांनी दाराला कुलूप कोणी लावले, त्यांचे नाव सांगा, अशी मागणी करून मामलेदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मामलेदार परब यांनी लोकांना कडक शब्दांत समज दिली. आपले काही म्हणणे असल्यास दाद मागा, असे त्यांनी भाविकांना सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

'राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही', वाळपईत मराठी भाषाप्रेमींचे धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT