Sky Bus In Pune| Nitin Gadkari Gomantak Digital team
गोवा

अपयशाने खचतील ते गडकरी कसले, गोव्यात स्कायबसची चाचणी अयशस्वी ठरल्यानंतर आता पुण्याला संधी

स्कायबसची संकल्पना मुळात गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2002 मध्ये मांडली होती.

Pramod Yadav

Sky Bus In Pune: काही वर्षांपूर्वी गोव्यात स्कायबस प्रकल्प सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. गोव्यातील हा प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता स्कायबसचा मोर्चा महाराष्ट्रातील पुणे शहरात वळविण्यात आलाय.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. पुण्यातील रस्त्यांचे आणखी रूंदीकरण होऊ शकणार नाही असे म्हणत गडकरींनी स्कायबसचे स्वप्न पुणेकरांना दाखवले आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. पुण्यातील रस्त्यांचे आता आणखी रूंदीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे शहरात स्कायबसची चाचपणी करता येईल.

अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांनी या प्रकल्पचे प्रेझेन्टेशन एकादा पाहून घ्यावे. स्कायबसची २५० प्रवासी क्षमता असून, त्यांचा हवाईमार्ग असेल असे त्यांनी कार्यक्रमावेळी नमूद केले. पुणेकरांनी या घोषणेचे स्वागत केले असून, पुण्यासारख्या शहरात याची अधिक गरज असल्याची स्थानिकांची भावना आहे.

दरम्यान, स्कायबसची संकल्पना मुळात गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2002 मध्ये मांडली होती. गोव्यासारख्या लहान राज्यासाठी उत्तम योजना असल्याचे त्यांचे मत होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (IIT) पदवीधर असणारे मनोहर पर्रीकर यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीसच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. पर्रीकर यांनी राज्यातील पायाभूत वाहतूक सुविधा यासह स्काय कनेक्टीव्हिटीसाठी प्रयत्न सुरू केले.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ला याबाबत प्रकल्प राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्याची सुरुवात देखील झाली. प्रकल्प सुरू करण्यासाठी मडगाव येथे 40 कोटी खर्चून 1.6 किलोमीटर लांबीचा चाचणी ट्रॅक बांधण्यात आला. KRCL च्या स्वदेशी स्कायबसने 15 सप्टेंबर रोजी या ट्रॅकवर पहिली चाचणीही घेण्यात आली. मात्र चाचणी अयशस्वी ठरली.

दरम्यान, या अपयशाने खचतील ते गडकरी कसले त्यांनी स्कायबसचे स्वप्न आता पुण्यात पूर्ण करण्याचा चंग बांधला असून, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT