Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: भाजपनंतर काँग्रेसही म्हादईचा गळा घोटण्यास तयार

कर्नाटक निवडणूक : म्हणे, कळसा-भांडुरा प्रकल्प वेळेत पूर्ण करणार; जाहीरनाम्यात ग्वाही

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवण्याच्या केंद्रीय जल आयोग आणि कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांना गोव्याचा विरोध आहे. तरीही म्हादई नदीच्या कळसा व भांडुरा उपनद्यांवरील प्रकल्प वेळेत पूर्ण करू, असे आश्वासन सोमवारी भाजपने जाहीरनाम्यात दिले होते.

त्याचीच ‘री’ आज काँग्रेसने ओढली. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज जाहीर केला. या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले असून पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, असे जाहीर केले.

कर्नाटकातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या भाजपच्या प्रमुख नेत्यांसह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक नेते प्रचारात उतरले आहेत.

उत्तर कर्नाटकात नागरिकांचा भाजपला पाठिंबा मिळावा, यासाठी यापूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगावमधील सभेत गोव्याच्या सहमतीने म्हादईचे पाणी कर्नाटकला दिले, असे वक्तव्य केले होते.

त्यामुळे गोव्यात असंतोष निर्माण झाला असून सध्या हा प्रश्न कोर्टात आहे. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर गोव्यात ‘सेव्ह म्हादई’ ही मोहीम जोरात सुरू झाली आहे.

भाजप-कॉंग्रेस नेते गोत्यात

या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनानंतर कर्नाटकात कोणतेही सरकार आले तरी म्हादईचे पाणी वळवले जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्यात परस्परविरोधी टीका करणारे काँग्रेस आणि भाजपचे नेते अडचणीत आले आहेत.

म्हादईसंदर्भात भाजप किंवा काँग्रेसची भूमिका कोणतीही असो, आम्ही म्हादईचे पाणी वळवू देणार नाही, अशी प्रतिक्रिया ‘सेव्ह म्हादई’ चळवळीच्या वतीने महेश म्हांबरे यांनी व्यक्त केली.

म्हादईसाठी 500 कोटी : सोमवारी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला होता, तर आज काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात कर्नाटकातील सर्व सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करू.

यासाठी 1.50 लाख कोटींची तरतूद करू, असे जाहीर केले आहे. म्हादई प्रकल्पासाठी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 500 कोटींचा निधी मंजूर करण्यात येईल, असेही म्हटले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

SCROLL FOR NEXT