Sri Kelbai Sausthan Dainik Gomantak
गोवा

अखेर मयेतील ‘रेड्या’ची जत्रा झालीच नाही!

मयेत भाविकांचा अपेक्षाभंग: ‘माले’ पेटले नसल्याने जत्रेवर झाला परिणाम

दैनिक गोमन्तक

डिचोली: मये येथील श्री महामाया केळबाय देवस्थानच्या माल्याच्या जत्रेवेळी अधिकाराच्या वादावरून ‘माले’ पेटले नसल्याची घटना सर्वश्रुत असतानाच, आता या गावची प्रसिद्ध ‘रेड्या’ची जत्राही अखेर साजरी झालीच नाही. जत्रा होणार म्हणून परंपरेप्रमाणे काल (शनिवारी) माशेलहून देवतांच्या तरंगांचे रात्री मये गावात आगमनही झाले होते. काही फेरीवाल्यांनी दुकानेही थाटली होती. मात्र अखेरपर्यंत रेड्याची जत्रा झालीच नाही. त्‍यामुळे भाविकांचा मात्र अपेक्षाभंग झाला.

‘रेड्या’ची जत्रा ही मयेतील श्री महामाया केळबाय देवस्थानची एक प्रमुख आणि प्रसिद्ध जत्रा. माल्याच्या जत्रेनंतर ही जत्रा साजरी करण्यात येते. काल (शनिवारी) रेड्याची जत्रा साजरा करण्याचा दिवस होता.

मात्र रात्री उशिरापर्यंत जत्रा साजरी करण्याबाबतीत कोणत्याच हालचाली वा तसे संकेत दिसून येत नव्हते. मध्यरात्रीपर्यंत रेड्याची जत्रा साजरीही झाली नाही. त्यामुळे ‘माल्या’च्या जत्रेपाठोपाठ ‘रेड्या’ची जत्राही वादाच्या विळख्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या 9 एप्रिल रोजी मयेत माल्याची जत्रा साजरी करण्यात आली होती. मात्र अधिकाराच्या वादावरून त्या जत्रेतील वैशिष्ट्य असलेले ‘माले’ अखेरपर्यंत पेटलेच नव्हते. माले पेटले नसल्याने श्री महामाया केळबाय देवीचा ‘पण’ही अपूर्ण राहिला होता. या पार्श्वभूमीवर ‘रेड्या’ची जत्रा साजरी होणार की नाही, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गेली सलग तीन वर्षे ‘रेड्या’ची जत्रा झालीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT