Tanisha Crasto Dainik Gomantak
गोवा

Goa News : २८ वर्षांनंतर गोमंतकीय खेळाडू ऑलिंपिक मैदानावर

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

पणजी, ऑलिंपिकमध्ये भारतीय क्रीडापटूंत गोमंतकीयांचे प्रतिनिधित्व नगण्यच. आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर गोव्यात मूळ असलेली खेळाडू महिलांच्या बॅडमिंटन कोर्टवर झळकणार आहे.

अटलांटा ऑलिंपिकमध्ये १९९६ साली लिअँडर पेस याने टेनिसमधील पुरुष एकेरीत ऐतिहासिक ब्राँझपदक जिंकले होते. गोमंतकीय वंशाचा क्रीडापटू ऑलिंपिकमध्ये खेळण्याची ती अखेरची वेळ होती. पॅरिसमधील स्पर्धेत गोमंतकीय तनिशा क्रास्टो बॅडमिंटनमधील महिला दुहेरीत सहकारी अश्विनी पोन्नाप्पा हिच्यासह पदकासाठी घाम गाळताना दिसेल.

२१ वर्षीय तनिशाचे आई-वडील दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील, पण व्यावसायिक कारणास्तव संयुक्त अरब अमिरातीतील दुबईत स्थायिक झाले.

तनिशाचा जन्म तेथेच झाला, मात्र भारताचे ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याच्या ध्येयाने ती मागील सात वर्षांपासून गोव्याकडून खेळत आहे. आता तिची स्वप्नपूर्ती झाली आहे. एकंदरीत तनिशा ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी २४ वी मूळ गोमंतकीय क्रीडापटू

आहे.

मेरी डिसोझा पहिली महिला

मेरी डिसोझा-सिक्वेरा भारतातर्फे ऑलिंपिक खेळलेली पहिली मूळ गोमंतकीय महिला क्रीडापटू आहे. १९५२ मधील हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये मेरीने ॲथलेटिक्समधील १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत भाग घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात कराची (आता पाकिस्तानात) येथे स्थायिक झालेला हॉकीपटू पीटर पॉल फर्नांडिस भारताकडून ऑलिंपिक खेळलेला (१९३६ बर्लिनमध्ये सुवर्ण) पहिला मूळ गोमंतकीय क्रीडापटू आहे.

पदकविजेते पेस पिता-पुत्र :

अटलांटा ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेता टेनिसपटू लिअँडर याचे वडील डॉ. वेस पेस हे भारताचे माजी हॉकीपटू. वेस पेस संघात असताना भारतीय पुरुष हॉकी संघाने १९७२ मधील म्युनिक ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. साहजिकच ऑलिंपिक पदकविजेते भारतीय पिता-पुत्र असा विक्रम वेस आणि लिअँडर यांच्या नावे आहे. या कुटुंबाचे मूळ सासष्टीतील असोळणा-वेळ्ळी परिसरात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT