Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Advalpal Mining: खाणप्रश्न तापला! 'अडवलपाल' ग्रामस्थांसाठी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन

Advalpal Mining Dispute: खाण लीज क्षेत्रातून मंदिरासह घरे-दारे वाचवा, अशी लोकांची मागणी आहे. दोन दिवसांपूर्वी गेल्या रविवारी अडवलपालमधील कोळमवाड्यावरील लोकांनी पंचायतीला निवेदनही दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Advalpal Mining Dispute Meeting

डिचोली: अडवलपाल खाणीच्या विषयावरून गावात असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच आता खाणीसंदर्भात येत्या शुक्रवारी (ता. २७) डिचोलीत अडवलपालच्या लोकांसाठी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३.३० वा. ही बैठक होणार आहे. तसे पत्र उपजिल्हाधिकारी कार्यालयातून अडवलपाल पंचायतीला पाठविण्यात आले आहे.

खाण लीज क्षेत्रातून मंदिरासह घरे-दारे वाचवा, अशी लोकांची मागणी आहे. दोन दिवसांपूर्वी गेल्या रविवारी अडवलपालमधील कोळमवाड्यावरील लोकांनी पंचायतीला निवेदनही दिले आहे. दरम्यान, अडवलपाल खाण लीज क्षेत्रातील मालमत्तेसंदर्भातची सुनावणी आता ६ जानेवारीला होणार आहे. उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या नोटिसांना अनुसरून काल (मंगळवारी) अडवलपालमधील संबंधित नोटीसधारक लोकांनी वकिलामार्फत उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले म्हणणे सादर केले आहे. यावर आता ६ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिरसई-अडवलपाल खाण ब्लॉक-५ अंतर्गत ‘फोमेंतो रिसोर्सीस’ कंपनीच्या खाण लीज क्षेत्रातून घरादारांसह शेती बागायती आणि नैसर्गिक जलस्रोते वगळा, अशी अडवलपाल गावातील लोकांची मागणी आहे. खाण लीज क्षेत्रात अडवलपाल गावातील ३६.२२०२ हेक्टर जमीन येत आहे. आमची मागणी कधी पूर्ण होणार, या प्रतीक्षेत असलेल्या लोकांच्या हाती वीस दिवसांपूर्वी नोटिसा पडल्या आहेत.

लोकांचा संघर्ष सुरू

मंगळवार, २४ रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी न्यायालयात दुपारी ३ वाजता सुनावणीला उपस्थित राहून संबंधित लोकांनी आपले म्हणणे मांडावे, अशी सूचना नोटिसीतून देण्यात आली होती. तूर्त अडवलपालमधील चौदा कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या कायदेशीर वारसदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, एकाबाजूने लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूने फोमेंतोची खाण सुरू झाली आहे. गाव उद्‌ध्वस्त होत असेल, तर खाण व्यवसाय नको, असा ठाम पवित्रा घेऊन लोकांचा संघर्ष सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन् सर्वजण आकाशाकडेच पाहत राहिले! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही; चाहत्यांनी पाहिला अद्भुत नजारा Watch Video

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Agniveer New Rules: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

SCROLL FOR NEXT