CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोवा पंचायतींवर प्रशासक; मुख्यमंत्री सावंत यांनी केली घोषणा

राज्यात पंचायत निवडणूका पावसाळ्यानंतरच ?

दैनिक गोमन्तक

गोव्यातील पंचायतींवर प्रशासक नेमला जाईल अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच केली आहे. मागासवर्गीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टची पूर्तता न झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. (Administrator on Goa Panchayat; Announcement made by Chief Minister Sawant )

पावसाळा तोंडावर असल्याने राज्यात पंचायत निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामूळे राज्यातील निवडणूका ह्या पावसाळा झाल्यानंतर घेण्यात याव्यात असा प्रस्ताव राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामूळे राज्यातील निवडणूका कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर सद्या नसले तरी येत्या काही दिवसात निवडणूक आयोग या प्रश्नाचे उत्तर निश्चित देऊ शकणार आहे.

गोवा राज्यात 186 पंचायती आहेत. या सर्व पंचायतींवर हा निर्णय लागू असणार आहे.सर्व पंचायतींचा 19 जून रोजी कालावधी संपल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री याबाबत म्हणतात की सरकारने तिहेरी चाचणी घेण्यात यावी आणि अहवाल सादर करावा अशी शिफारस करणारी फाइल निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे.

पंचायत निवडणुकीची तारीख निश्चित होत नसल्याने संभाव्य उमेदवार संभ्रमावस्थेत

सुरुवातीला 4 जून ही तारीख पंचायत निवडणुकीसाठी निश्चित केली होती. त्यानंतर ती 12 जून करण्यात आली. पण आता आरक्षणाच्या गोंधळामुळे ही निवडणूक 12 जूनला होणे शक्य नाही. ही निवडणूक सहा महिने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास 20 जूनपासून सर्व 186 पंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येईल. 19 जून हा विद्यमान पंचायतींचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी सर्व पंचायतीतल्या प्रतिनिधींचा काळ संपुष्टात येईल आणि ग्रामस्थांना कामांकरिता प्रशासकांवर अवलंबून राहावे लागेल. मुख्य म्हणजे यामुळे काही संभाव्य उमेदवारांच्या प्रचारावर पाणी पडण्याची शक्यता दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT