Ramesh Tawadkar X
गोवा

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

Ramesh Tawadkar: आदिवासी भवनाचे काम पुढील दोन महिन्‍यांत सुरू करण्‍यात येईल, अशी हमी आदिवासी कल्‍याण खात्‍याचे मंत्री रमेश तवडकर यांनी गुरुवारी पर्वरीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

Sameer Panditrao

पणजी: आदिवासी भवनाचे काम पुढील दोन महिन्‍यांत सुरू करण्‍यात येईल, अशी हमी आदिवासी कल्‍याण खात्‍याचे मंत्री रमेश तवडकर यांनी गुरुवारी पर्वरीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

गेल्‍या काही वर्षांपासून राज्‍यात आदिवासी भवनाचा विषय सातत्‍याने गाजत आहे. गोविंद गावडे आदिवासी कल्‍याण मंत्री असताना सरकारने आदिवासी भवन उभारण्‍यासाठी आदिवासी कल्‍याण खात्‍याला पर्वरी येथील जमीन दिली होती.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या हस्‍ते या प्रकल्‍पाचे भूमिपूजनही झाले होते. परंतु संबंधित जागेवर कोमुनिदादने दावा केल्‍याने हा प्रकल्‍प वादाच्‍या भोवऱ्यात सापडला. यावरून गावडे आणि सभापतींमध्‍ये काहीवेळा जुंपली होती.

अधिवेशनात गोविंद गावडे यांनी आपण मंत्री असताना जमिनीबाबत सर्व विषय मार्गी लावलेले आहेत. सरकारने तत्‍काळ या प्रकल्‍पाच्‍या उभारणीस सुरुवात करावी, अशी मागणी केली होती. मंत्री रमेश तवडकर यांच्‍याकडे आदिवासी कल्‍याण खाते आल्‍यानंतर त्‍यांनीही आदिवासी भवनाच्‍या कामास गती देण्‍याची हमी दिली होती.

‘जीएसआयडीसी’कडून प्रक्रिया सुरू

राज्‍य सरकारने पर्वरीतील नियोजित जागेत आदिवासी भवन उभारण्‍याची जबाबदारी राज्‍य साधनसुविधा विकास महामंडळाकडे (जीएसआयडीसी) दिली आहे. त्‍यानुसार ‘जीएसआयडीसी’ने प्रक्रिया सुरू केली असून, सल्लागारांच्‍या नेमणुकीसाठी लवकरच निविदा जारी करण्‍यात येणार आहेत. या प्रकल्‍पासाठी सुमारे ६० कोटींचा खर्च येणार असल्‍याची माहिती ‘जीएसआयडीसी’च्‍या सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: समेस्त गोंयेकरांक, दिवाळीची परबी!

Anjuna Assault: धारदार शस्त्राने डोक्यावर केला वार, 1 महिन्यानंतर पीडित व्हेंटिलेटरवरच; संशयिताचा जामीन फेटाळला

Sacorda: '2 लाख 42 हजार नेमके कुठे खर्च झाले'? साकोर्डा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार! पंच-सरपंचांच्या राजीनाम्याची होतेय मागणी

'पात्रांवशिवाय मजा नाही'! फोंडावासीयांची दिवाळी सुनी-सुनी; नाईक यांच्या निधनानंतर फोंड्यात उदासीनतेचे सावट

Goa Politics: 'मगोपमध्ये जाणार काय'? आजगावकर म्हणाले 'मग पाहू'; ढवळीकरांना अजूनही नेता मानत असल्याचे दिले उत्तर

SCROLL FOR NEXT