Adinco Industries Dainik Gomantak
गोवा

Adinco Industriesचे बांधकाम बेकायदेशीर; कंपनीला अवेडे कोठंबी ग्रामस्थांचा विरोध

दैनिक गोमन्तक

अवेडे कोठंबी येथील Adinco Industries ने शेड बांधण्यासाठी पंचायतीकडे परवानगी मागितली असून ती देऊ नये, असे आज अवेडे पंचायतीत झालेल्या खास ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. सदर कंपनीने जे काही बांधकाम केले आहे ते बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी लोकांनी केला. सदर बांधकामांविरोधात पंचायत आता लोकांच्या मागणीनुसार न्यायालयात जाणार असल्याचे सरपंच भुपेंद्र देसाई यांनी सांगितले.

अवेडे कोठंबी येथे गेल्या काही वर्षांपासून adinco ही कंपनी चालू असून सदर कंपनी लोकवस्तीत असल्याने या कंपनीला लोकांनी आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे बांधकाम नदीच्या काठावर आल्याने कंपनीने CRZ चे उलंघन केले असल्याचे लोकांनी यावेळी सांगितले.

कंपनीकडे जाणारा रस्ता बराच अरुंद असल्याने गंभीर अपघात होऊ शकतो. तसेच यासाठी या प्रदूषणकारी कंपनीला कोणतेच परवाने पंचायतीने देऊ नये असा ठराव यावेळी घेण्यात आला. सदर कंपनीने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिवसाकाठी 500 ते हजार बॉक्स दारू पॅकिंग करण्यासाठी परवानगी मागितली आहे तसेच नवीन शेड बांधण्यासाठी पंचायत संचालकांनी त्यांना परवानगी दिली असून तिच्या विरोधात न्यायालयात जाण्यासाठी पंचायतीला फक्त दहा दिवसांचीच मुदत देण्यात आली आहे, असे सरपंच भुपेंद्र देसाई यांनी सांगितले.

आज झालेल्या ग्रामसभेत सदर बांधकामांविरोधात लोकांच्या मागणीनुसार आम्ही सदर शेडच्या बांधकामांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

SCROLL FOR NEXT