Advocate Dainik Gomantak
गोवा

Goa Advocate: वकील मारहाण प्रकरण चिघळण्याची शक्यता; संबंधित पोलिसांना '48' तासांच्या आत निलंबित करा

Mapusa: दक्षिण गोवा वकील संघटनेच्या बैठकीत पोलिसांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: म्हापसा येथील वकील ॲड. गजानन सावंत यांच्यावर पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा वकील संघटनेने काल तातडीची बैठक घेऊन या प्रकरणी गुंतलेल्या दोन पोलिसांना तसेच 2 अज्ञात पोलिसांना 48 तासांच्या आत अटक करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

जर पर्वरी पोलिस स्थानकातील अधिकारी या प्रकरणी गुंतलेल्या पोलिसांना संरक्षण देत असतील, तर वकील संघटना गप्प बसणार नाही व आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी दिली.

या बैठकीत 8 ठराव मंजूर करण्यात आले असून त्यात संबंधित पोलिसांना अटक करून निलंबित करणे, जे जे या प्रकरणात गुंतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, हे प्रकरण सीबीआयकडे सोपविणे तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकरवी या प्रकरणाची चौकशी करणे, पोलिस स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही ऑनलाइन पाहता येईल याची व्यवस्था करणे, वकील गजानन सावंत यांच्यावरील नोंदवलेला गुन्हा मागे घेणे व वकील सावंत यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणे यांचा समावेश आहे.

लोकहित याचिकेचा विचार व्यक्त

या बैठकीत अनेक वकिलांनी आपले विचार मांडताना या प्रकरणी उच्च न्यायालयात लोकहित याचिका सादर करण्यात यावी, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. देशात व राज्यात पोलिस राज्य सुरू झाले असून लोकशाहीची थट्टा सुरू आहे, एका वकिलावरील हल्ला म्हणजे संपूर्ण कायदा प्रक्रियेवरील हल्ला असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT