Lakshmi Manchu Accused Indigo Airlines
पणजी : दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहन बाबू यांची मुलगी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मंचू सध्या तिच्या एका पोस्टमुळं चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिनं इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी गोवा विमानतळावर आपला छळ केल्याचा आरोप केला.
लक्ष्मी मंचू हिनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर काही पोस्ट करत इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी आपला छळ केल्याता आरोप केला आहे.
'एक्स'वर पोस्टमध्ये तिनं म्हटलं की, "विमानात माझी बॅग खेचण्यात आली. त्यानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी मला माझी बॅग उघडू दिली नाही. कर्मचाऱ्यांकडून यावेळी धमकी देखील देण्यात आली. तुमची बॅग गोव्यातच राहील, अशी धमकी त्यांनी दिली. कर्मचारी प्रवाशांसोबच खूप असभ्य वागत आहेत, असा आरोप तिनं पोस्ट करत केला आहे.
"इंडिगो कंपनीकडून हा छळ सुरू आहे. विमानातील कर्मचाऱ्यांनी काही प्रवाशांच्या बॅगा जप्त केल्या होत्या, कारण त्यामध्ये स्लीप एपनिया मशीन, चमचे, काटे आणि चाकू होते.
एका मुलीला तिचं सामान वेळेवर तपासता आलं नाही म्हणून तिला तिचं सामान सोडावं लागलं. इंडिगोकडून नेहमीच अपमान केला जातोय," असं लक्ष्मी मंचूनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इंडिगो एअरलाइन्सनं अभिनेत्रीच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला आहे. इंडिगो एअरलाइन्सनं म्हटलं की, "मॅडम, तुम्हाला त्रास झाला हे आम्हाला समजतं.
आमच्या रेकॉर्डनुसार, तुमच्या चेक-इन बॅगमध्ये प्रतिबंधित वस्तू आढळल्यानं विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ती बॅग बाजूला घेतली. तुमचा प्रवास सुखद राहो, अशी आमची इच्छा आहे," असं स्पष्टीकरण इंडिगो एअरलाइन्स दिलं आहे.
लक्ष्मी मंचू प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन बाबू आणि विद्या देवी यांच्या त्या कन्या आहेत. लक्ष्मीनं अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकन टेलिव्हिजन मालिकेतून केली, ज्यामध्ये 'लास वेगास' या मालिकेत सरस्वती कुमारची भूमिका साकारली. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी 'अनगनगा ओ धीरुडू' (2011) या चित्रपटातून पदार्पण केले.
लक्ष्मी मंचू यांनी 'लक्ष्मी बॉम्ब', 'डब्ल्यू/ओ राम', 'पिट्टा कथलू', 'मॉन्स्टर' आणि 'गुंटूर टॉकीज' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं दोन दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन राज्य नंदी पुरस्कार जिंकले आहेत. लक्ष्मी मंचूच्या अभिनय कौशल्यामुळे आणि सामाजिक कार्यामुळे लक्ष्मी मंचू यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.