Illegal Construction In Goa
Illegal Construction In Goa Dainik Gomantak
गोवा

बांबोळी समुद्रकिनारी भिंत बांधण्यास कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध

दैनिक गोमन्तक

बांबोळी: गोयंकर अगेन्स्ट मरीना (GAM) च्या बॅनरखाली कार्यकर्ते आणि स्थानिक सोमवारी बांबोलीम बीचवर एकत्र येवून एका तारांकित हॉटेलनच्या अतिक्रमण केलेल्या बांधकामाला कडाडून विरोध केला. संबंधित हॉटेल समुद्रकिनाऱ्यावर रिटेनिंग वॉल बांधत आहे. हे बांधकाम जवळपास पुर्ण होत आले आहे. त्याशिवाय नौक्सिम मरिना प्रकल्पाच्या प्रस्तावित पुन:बांधकामाला तसेच मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या मान्यतेलाही विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Activists strongly oppose construction of Bambolim Illegal beach wall)

या बैठकीत बोलताना कार्यकर्ते व आपचे नेते रामराव वाघ यांनी सांगितले की, या मेळाव्याचा मुख्य केंद्रबिंदू समुद्रकिनारी अतिक्रमण करून तारांकित हॉटेलने (Goa Hotel) उभारलेल्या रिटेनिंग वॉलच्या बांधकामाला विरोध करणे आहे. "समुद्रकिनारी परिसरात तीन मीटरपेक्षा जास्त अतिक्रमण असल्याने भिंतीच्या बांधकामात अनियमितता आहे," असे वाघ यांनी स्पष्ट केले.

जीएएमचे संयोजक अ‍ॅड सुरेश पालकर म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यावर हॉटेल मालक पुन्हा हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. “तपासणी न करताच हे बांधकाम (Illegal Construction) करण्यात आले म्हणून पंचायत परवान्यावरही शंका उपस्थित केल्या जात आहेत,” असा आरोप पालकर यांनी केला, तर उच्च भरतीच्या मार्गावरही बांधकाम होत आहे, ज्याला परवानगी नाही.

दरम्यान, स्थानिक पंच सूर्यकांत आंद्राडे यांनी सांगितले की, कुर्का-बांबोलीम पंचायतीने रिटेनिंग वॉल बांधण्याचा परवाना केव्हा जारी केला होता याची माहिती नसल्याचे सांगितले. “मी पाक्षिक बैठकीला हजर होतो पण भिंत बांधण्याच्या परवान्याचा मुद्दा कधीच समोर आला नाही. तारांकित हॉटेलने बोर्ड लावला तेव्हाच मला परवान्याबद्दल कळले,” असा दावा आंद्राडे यांनी केला.

शेवटी, जीसीझेडएमए (GCZMA), टीसीपी आणि कर्का पंचायत यांसारख्या संबंधित अधिकाऱ्यांना उल्लंघन केल्यामुळे भिंत बांधकामासाठी दिलेले परवाने रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्का-बांबोलीम पंचायतीला या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यास भाग पाडण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT