Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात कोरोनाचा जोर ओसरला, सक्रिय रूग्ण संख्येत मोठी घट

मागील दोन दिवसांत राज्यात केवळ 14 कोरोना रूग्णांची नोंद

Pramod Yadav

गोव्यातील कोरोना संसर्गाचा जोर ओसरला आहे. दैनंदिन कोरोना रूग्णसंख्येत होणारी वाढ देखील कमी झाली असून, आज दिवसभरात केवळ सात नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. तर, नऊ कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट झाली असून, सध्या गोव्यात 48 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.43 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 996 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 935 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 477 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

मंगळावारी देखील गोव्यात केवळ सात नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली होती. तर, सहा कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. गोव्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आला आहे. मागील काही दिवासांपासून नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली असून, सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 50 च्या जवळपास फिरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'पार्टटाईम नोकरी'च्या आमिषाने 3.69 लाखांचा गंडा; कोरगावातील युवतीची पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

Goa Market Complex: डिचोलीतील बाजार संकुलाची होणार दुरुस्ती; आमदारांकडून संकुलाची पाहणी

Goa Heavy Rain: सत्तरीत वादळी वाऱ्यामुळे 27 ठिकाणी झाडे कोसळली; पडझड सुरूच, अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ

Goa Fraud Case: फरार बलरामच्या शोधासाठी विमानतळांवर 'अलर्ट'; ED अधिकाऱ्याचे सोंग घेऊन लूट, 'इंटर ऑपरेबल सिस्टिम'द्वारे शोध सुरू

Goa Drug Case: पणजी अमलीपदार्थ प्रकरण; संशयिताचा 'डिफॉल्ट' जामीन अर्ज फेटाळला, रासायनिक अहवालावरून कोर्टात खल

SCROLL FOR NEXT