goa police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कोलवा, तेरेखोल, आसगाव, फाेंडा आणि किती..? सामान्यांच्या मनात वर्दीबद्दल राग आणि भीतीची भावना

Goa Police: पोलिसच आपली जबाबदारी योग्‍यप्रकारे निभावतात का असा प्रश्‍‍न या काही घटनांमुळे ऐरणीवर आला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: राज्यातील खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना गेल्या आठ महिन्यांत घडल्या. भ्रष्टाचार, अपहरण, बळजबरी, सतावणूक अशा विविध प्रकरणांत पोलिसांवर झालेल्या कारवायांमुळे सामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दल राग आणि भीतीची भावना निर्माण झाली आहे.

खाकी वर्दीला काळिमा फासणारे या पहिल्‍या आठ महिन्‍यांतील एक प्रकरण म्‍हणजे, कोलवा पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर याने एका महिलेला आपले बूट चाटायला लावल्‍याचा आरोप झाला होता. मात्र, हे प्रकरण नंतर फारसे कुणी लावून न धरल्‍याने केवळ त्‍या उपनिरीक्षकाच्‍या बदलीवर ते निभावले.

नागरिकांना सुरक्षा देणे हे ज्‍यांचे कर्तव्‍य, ते पोलिसच आपली जबाबदारी योग्‍यप्रकारे निभावतात का, असा प्रश्‍‍न या दोन घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्‍हणजे, तेरेखोल किनारपट्टी पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक विदेश पिळगावकर आणि याच पोलिस स्‍थानकात शिपाई म्‍हणून काम करणारे संजय तळकर व राजू कळंगुटकर या तिघांना एप्रिल महिन्‍यात भ्रष्‍टाचार प्रतिबंधक विभागाकडून झालेली अटक होय.

तेरेखोल परिसरात पॅराग्‍लायडिंग क्रीडा प्रकार चालविणाऱ्या व्‍यावसायिकांकडून या तिघांनी आपल्‍याला दरमहा दहा हजार रुपये हप्‍ता द्यायला हवा, असे सांगून लाच मागण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे तक्रारीत म्‍हटले होते. याच प्रकरणात या तिघांनाही नंतर अटक करण्‍यात आली होती.

या पहिल्‍या आठ महिन्‍यांतील आणखी एक लक्ष्‍यवेधक प्रकरण म्‍हणजे, पोलिस उपस्‍थित असताना आसगाव येथे बाऊन्‍सर्सचा वापर करून दिवसाढवळ्‍या पाडल्‍या गेलेल्‍या घराचे प्रकरण. या प्रकरणात नंतर हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्‍यासह अन्‍य दोन पोलिस उपनिरीक्षकांना निलंबित करण्‍यात आले होते. या प्रकरणात पोलिस महासंचालकांच्‍या सांगण्‍यावरून आपण काही हालचाल केली नाही, असा कबुलीजबाब प्रशाल देसाई यांनी दिल्‍यानंतर गोव्‍याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांचीही गोव्‍यातून बदली करण्‍यात आली होती.

पाेलिसांचा हलगर्जीपणा

पाेलिसांच्‍या हलगर्जीपणाचे आणखी एक गाजलेले प्रकरण म्‍हणजे, फोंड्यातील कन्‍हैयाकुमारचे खून प्रकरण. २४ जून रोजी या कन्‍हैयाकुमार याला फाेंड्यातील रॉबर्ट पोलिसांनी पकडले होते. मात्र, त्‍याला पोलिस लॉकअपमध्‍ये न ठेवता फोंड्यातील पाेलिसांनी लोटली येथे आणून साेडले होते. त्‍याच रात्री कुणीतरी कन्‍हैयाकुमारचा खून केला. या प्रकरणात सेेवेत हलगर्जीपणा केल्‍याचा आरोप ठेवून एका हवालदारासह दोन पोलिस शिपायांना निलंबित करण्‍यात आले होते.

वादग्रस्‍त पोलिस पिंगेचे निलंबन

सांगे पोलिसांत उपनिरीक्षक म्‍हणू्न काम करत असताना १० एप्रिल रोजी नारायण पिंगे याला निलंबित करण्‍याचा आदेश काढण्‍यात आला हाेता. फोंडा पोलिस स्‍थानकात काम करताना त्‍याने काही कागदपत्रात फेरफार केल्‍याचा आरोप त्‍याच्‍यावर ठेवण्‍यात आला होता.

त्‍यापूर्वी २०२१ मध्‍येही दुहेरी लग्‍न केल्‍याची आणि एका महिलेची लुबाडणूक केल्‍याची तक्रार केल्‍यानंतर त्‍याला निलंबित करण्‍यात आले होते. याशिवाय कोलवा येथे एका पर्यटकाकडून लाच मागण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या आराेपावरून एका महिला साहाय्‍यक उपनिरीक्षकासह दोन हवालदारांना निलंबित करण्‍यात आले होेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT