OBC Federation Of Goa Dainik Gomantak
गोवा

OBC Federation Of Goa: ‘ओबीसीं’ना हवे स्वतंत्र मंत्रालय

Goa OBC: खासगी कर्मचाऱ्यांचे वेतन ओबीसी दाखल्यासाठी विचारात घेण्याबाबत मतभेद निर्माण झाले आहेत त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘ओबीसीं’साठी स्वतंत्र मंत्रालय तसेच शैक्षणिक संस्था व नोकऱ्यांतील राखीव जागांबाबत अधिक आक्रमकपणे कार्यवाही करावी. ओबीसी दाखल्यासाठी येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी सर्व तलाठी व उपजिल्हाधिकाऱ्यांना सरकारने स्पष्ट निर्देश द्यावेत. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन ओबीसी दाखल्यासाठी विचारात घेण्याबाबत सध्या मतभेद निर्माण झाले आहेत, त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ‘ओबीसीं’तर्फे करण्यात येणार आहे.

देशभरातील कोट्यवधी ओबीसींचे उद्धारकर्ते मंडल आयोगाचे अध्यक्ष बी.पी. मंडल यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त २५ ऑगस्ट रोजी गोव्यात भव्य ‘ओबीसी मेळावा’ घेण्याचा निर्णय सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहेत.

ओबीसी महामेळावा आयोजित करण्यासाठी ओबीसी महासंघाच्या गोवा शाखेचे सरचिटणीस सर्वेश बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखाली खास आयोजन समिती निवडण्यात आली आहे. महासंघाचे कायदा सल्लागार ॲड. पराग वेळुसकर हे समितीचे सरचिटणीस आहेत.

‘ओबीसीं’त समावेश असलेल्या १९ पैकी बहुतेक सर्व समाजांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. त्यात खारवी समाजाचे अध्यक्ष पद्मनाभ आमोणकर, सतरकर महासंघाचे अध्यक्ष प्रशांत माईणकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष प्रेमानंद शेटकर, नाभिक समाजाचे सचिव लाडू सुर्लकर, गुरुदास सावळ, एकनाथ शिरोडकर, ॲड. नीलेश पटेकर, दीपा चोडणकर, नोनू नाईक, सुनील शेट, खेलन गावडे, किशोर परवार‌, दामोदर नाडर, रेखा आमोणकर, वैशाली आमोणकर आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती.

गोवाभर जागृती अभियान राबविणार

२५ ऑगस्ट रोजी दिवसभर चालणारा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गोवाभर जागृती अभियान हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक व सरचिटणीस सर्वेश बांदोडकर बाराही तालुक्यांचा दौरा करणार आहेत.

या आयोजन समितीचे कार्य गोवाव्यापी करण्यासाठी इतर पदाधिकारी व सदस्य स्वीकृत करण्यात येतील. तसेच ओबीसी, एससी व एसटी समाजाचे आमदार, मंत्री, जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT